
पोलिस प्रशासनाची अनदेखी ,
बुलडाणा , प्रतिनिधी
“गाव तस चांगल…., पण वेशीला टांगल”…. अशी एक म्हण मराठीत आहे. याच म्हणीचा प्रत्यय सद्या नांदुरा तालुक्यातील “वडनेर” या गावात येतोय. वडनेर या गावातून च राष्ट्रीय महामार्ग क्र.6 जात असल्याने तसेच राजकीय व आर्थिक दृष्ट्या वडनेर गावाची तालुक्यात च नव्हे तर जिल्ह्यात ख्याती आहे. गावाची ख्याती वाढविण्याची जबाबदारी गावच्या नेते मंडळी वर असते परंतु वडनेर ची नेते मंडळी च अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असतील तर एक दिवस वडनेर गाव अवैध धंद्यांचे “हेड ऑफिस ” बनल्या शिवाय राहणार नाही.
तसेच पोलिस प्रशासनाच्या कृपा आशीर्वादाने वडनेर गावात वरली मटका, दारू खुलेआम सुरू असून
पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सदर बाबीकडे दुर्लक्ष करीत असून अवैध धंदे चालवणाऱ्यांचे मात्र सुगीचे दिवस आले आहेत. सदर अवैध धंदे चालवणाऱ्यांचे मनोबल एवढे वाढले आहे की ते खुलेआम अवैध दारू विक्री व वरली मटका चालवत आहेत तरी या अवैध धंद्यामुळे तरुण मुले व्यसनाधीन होत असून अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहेत, तसेच सदर अवैध धंदे बस स्थानक तसेच गावातील मुख्य रस्त्यावर खुले आम सुरू असून, दारुड्यांचा त्रास रस्त्याने ये – जा करणाऱ्या महिला व शाळकरी मुलींना याचा नाहक त्रास होत आहे तरी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष देऊन सदर अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.

गावात खुलेआम मिळत असलेली अवेध दारू ,












































