Home बुलडाणा अंढेरा फाटा येथे जलद बस गाड्यांना थांबा दुर्लक्षितच…!

अंढेरा फाटा येथे जलद बस गाड्यांना थांबा दुर्लक्षितच…!

184

पाच वर्षांनंतरही जलद बस थांबेना.प्रवाशांची हेळसांड सुरुच

प्रतिनिधी:-रवि अण्णा जाधव

देऊळगाव मही:-स्थानिक अंढेरा फाटा हा सोलापूर-मलकापुर राज्य महामार्गावरील महत्वाचा थांबा असुन अंढेरा फाटा येथुन अंढेरासह सेवानगर,पिंपरी आंधळे,शिवणी आरमाळ,मेंडगांव, बायगाव बु,पाडळी शिंदे,सावखेड नागरे येथील प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात संभाजी नगर,अकोला येथे दवाखान्यात उपचारासाठी नेहमीच ये जा करतात.तसेच अंढेरा सह परिसरातील विद्यार्थी सुध्दा तालुका तसेच जिल्हा ठिकाणी शिक्षणासाठी एस.टी बसने अपडाऊन करतात.
अंढेरा फाटा येथे जलद बस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी अंढेरा येथील शिवसेना नेते सुभाष डोईफोडे,मा.सरपंच संतोष नागरे,तसेच पाडळी शिंदे येथील मा.सरपंच तथा पञकार स्वप्निल शिंदे यांनी व प्रवासी वर्ग यांनी पण परिवहन मंत्री तथा परिवहन विभाग बुलढाणा यांच्या कडे वेळोवेळी पाठपुरावा केला.आणि त्यात सर्वांना यश आले.अंढेरा फाटा येथे जलद बस गाड्यांना थांबा देण्यात आल्याचे परिवहन विभाग बुलढाणा यांनी दि.१४आॕगस्ट २०१८ रोजी पञाच्या आदेशाने महामंडळाचे विभाग नियंत्रक संभाजीनगर,अकोला,अमरावती,वर्धा,जालना,सोलापूर,बिड, यवतमाळ या.परिवहन विभागांना पञ पाठवुन चिखली-देऊळगाव राजा महामार्गावरील अंढेरा फाटा येथे सर्वच लांब पल्ल्याच्या जलद गाड्या तसेच मध्यम पल्ल्याच्या गाड्यानां प्रवाशांच्या मागणीनुसार थांबा देण्यात आला असून अंढेरा फाटा चार्जेबल स्टेज ४.५असुन अंढेरा फाट्याचे अॕब्रिवेशन आहे.तरी सर्व विभागाच्या वाहक तसेच चालकाने अंढेरा फाटा येथे जलद बस गाड्यांना थांबा देऊन असुन तेथुन प्रवासी वर्गांना चढ, उतार करण्याबाबत योग्य सुचना देण्याच्या स्पष्ट आदेश असताना वाहक-चालक आपलीच मनमानी करत असुन प्रवाशांना अंढेरा फाटा येथे जलद बस थांबणार नसल्याचे रोज दिसत आहे.प्रवासी वर्ग यामध्ये जेष्ठ नागरिक, महिला तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

असा घटला धक्कादायक प्रकार
काल दि.१८ मे २०२३ रोजी अकोला-सिडको बस संभाजीनगर डेपोची बस चिखलीवरुन येत असताना चिखली वरुन महिला तसेच काही अपंग व काही पुर्ण तिकीट असणारे व्यक्ती अंढेरा फाटा येथे येण्यासाठी बसले असता सदर बसच्या महिला वालक यांनी अंढेरा फाटा येथे जलद बस थांबणार नाही.त्यामुळे तुम्हाला मेरा खुर्द येथे उतरावे लागेल.असे म्हणून. मेरा खुर्द फाट्याचे तिकीट दिले.यातील सुभाष गाडे यांनी अंढेरा येथील पञकार ज्ञानेश्वर म्हस्के यांन याबाबत विचारले असता अंढेरा फाटा येथे जलद बस गाड्यांना थांबा असल्याचे पञच त्यांनी पाठवल्याने सदर वाहक यांनी अंढेरा फाटा येथे बस थांबवते म्हणून परत मेरा खुर्द ते अंढेरा फाट्याचे तिकीट दिले.परंतु काही अर्ध्या तिकिट वाल्या महिला माञ मेरा खुर्द फाट्यावर उतरल्या.यावरुन एक महिला वाहकच महिलांची अवहेलना करताना दिसुन आली.महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने जेष्ठ नागरिक यांना मोफत प्रवास केला.एवढेच नव्हे महिलांच्या सन्मानासाठी अर्धे तिकीटात प्रवास अशा प्रवांशाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या योजना शासन राबवते.परंतु काही कामचुकार,आळशी, हेकेखोर चालक,वाहक तसेच अधिकारी यांच्या मुळे सर्व सामान्य जनतेला यांचा फायदा होताना दिसत नाही एवढे मात्र खरे!.

सिडको आगार व्यवस्थापक यांच्याकडुन दिशाभूल
सदर प्रकाराबाबत सिडको आगार व्यवस्थापक संतोष घाने यांना विचारले असता संभाजीनगर सिडको ते अकोला, अमरावती ,नागपुर अशा लांब पल्ल्याच्या गाड्याचे अंतर खुप असुन अंढेरा फाट्यावर बस थांबणार नाही.वेळ फार कमी असतो असे सांगुन दिशाभूल केली.सदर बस थांब्याचे बुलढाणा विभागाचे पञ पाठवले असता ते उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आपण आपल्या बुलढाणा परिवहन विभागाकडे मागणी करावी.असे प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले.

चौकट
*अंढेरा फाटा येथे बस थांब्यावर जलद बस नियमीत न थांबल्यास परिसरातील प्रवाशांच्या वतीने विभागीय नियंत्रक बुलढाणा यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल!* ( भारती अमोल इंगळे )
सामाजिक कार्यकर्त्या अंढेरा