Home यवतमाळ कै बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री चिंतामणी पांडे व उपाध्यक्षपदी...

कै बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री चिंतामणी पांडे व उपाध्यक्षपदी श्री सुभाष अतकर

312

 

यवतमाळ – कै बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्था र नं 328 या संस्थेची निवडणूक रविवार दिनांक 9 10 2022 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे पार पडली श्री चिंतामणी पांडे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनलच्या 11पैकी 11 ही उमेदवार निवडून आले निवडून आलेल्या सर्व उमेदवार मधून अध्यक्ष व उपाध्यक्ष ची निवड निवडणूक अधिकारी मा. श्री अनिल नाईक सहायक निबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 10 2022 रोजी सभा संस्थेच्या कार्यालयात पार पडली अध्यक्ष पदासाठी श्री चिंतामणी पांडे उपाध्यक्ष पदासाठी श्री सुभाष आनंदराव आतकर यांनी नामनिर्देशन पत्र भरले त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचेही नामनिर्देशित पत्र प्राप्त झाली नाही म्हणून
कै बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ र नं,. 328 या संस्थेच्या अध्यक्षपदी श्री चिंतामणी प्रभाकर पांडे व उपाध्यक्षपदी श्री सुभाष आनंदराव अतकर यांची अविरोध निवड करण्यात आली त्यावेळी सर्व निवडून आलेले संचालक कवडू नगराळे, राजेश निशाने, गिरधारी बैसानी, सूर्यकांत वैद्यवार ,प्रमोद येंडे, बादल राठोड, संजय इंगोले ,अर्चना सरमुकदम, अर्चना ठोकळ ,उपस्थित होते तसेच माजी उपाध्यक्ष निळकंठ वांढरे माजी संचालक मनोज पटेल ,कैलास शिंदे ,,संजय माळवी ,अशोक ठोकळ, जयंत ठाकरे ,रवींद्र धामणवार ,देवेंद्र सरमुकदम ,शितल परदेशी, बालाजी नागरी सहकारी पतसंस्था डिग्रस चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शामकुमार लोखंडे,प्रफुल चाटे व संस्थेचे कर्मचारी रुंद व दैनिक आवर्त ठेव प्रतिनिधी उपस्थित होते.