
यवतमाळ – बळीराजा पार्टीच्या महाराष्ट्र,प्रदेश अध्यक्षपदी बाळासाहेब रास्ते यांची निवड केल्याची घोषणा बळीराजा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्रसिंग धावडे यांनी आज यवतमाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मध्ये जाहीर केले.बळीराजा पार्टीच्या शेतकरी आत्महात्ये बाबत पक्षाच्यावतीने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आसल्याची घोषणा त्यांनी केली व यवत माळ साठी राबवण्यात आलेली आमृतजल योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी पार्टीच्यावतीने करणार असल्याचे सांगण्यात आले. नगर पालिकेच्या निवडणुक मित्रपक्षासोबत लढवण्याची घोषणाही या वेळी करण्यात आलीआहे.यावेळी नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांनी पक्षाच्या वतीने शेतकरी,शेतमजुर,महीला,विद्यार्थी यांच्या साठी महाराष्ट्र भर दौरे करुन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले,यावेळी उस्मानाबाद,जिल्हाअध्यक्ष,महादेव कांबळे,दिनेश पाटिल,उतमराव टाकरस,अंकुशराव राहते शेतकरी संघटना समन्वय समिती कार्याध्यक्ष धनंजय काकडे पाटिल इ.कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष श्याम बजाज यानी सर्व पत्रकार बंधुचे स्वागत करुण आभार मानले.











































