Home यवतमाळ मोठ मोठ्या नेत्याचे फोन अन््‌ भ्रष्ट्राचार प्रकरणाची दखल घेईल कोण ?

मोठ मोठ्या नेत्याचे फोन अन््‌ भ्रष्ट्राचार प्रकरणाची दखल घेईल कोण ?

319

तक्रारदाराच्या जिद्दीला सलाम

यवतमाळ (प्रतिनिधी)
वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयाचा गौनखनिज खुले आम कोणतीही शासनाची परवानगी न घेता खुल्या बाजारात विकली यामध्ये रेल्वे कंत्राटदार, उपकंत्राटदार व सरकारी अधिकारी सहभागी असल्याचे स्पष्ट होउन किंवा निदर्शनास आणून सुध्दा दोषी अधिका-यांवर कुठलीच कारवाई झालेली नाही. कारण बड्या नेत्याचा एक फोन आला की प्रकरण बंद होते हे निश्‍चित.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार अमोल कोमावार यांनी गेल्या ३ वर्षापासून सतत पाठपुरावा करुन वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातीचा गौनखनिज रेल्वे कंत्राटदार श्री. मुथा यांना पकडून दिले. कागदोपत्री त्यांनी वरिष्ठांसमोर स्पष्ट करुन दिले. श्री.गोसावी (खनिकर्म अधिकारी) यांच्या बाबत सर्व पुराव्यानिशी सुनावणी झाल्यावरही दोषी असल्याचे स्पष्ट झालेले असतांना देखील त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. किंवा हेतू पुर्वक कारवाई साठी टाळाटाळ करण्यात येत आहे.
खरी परिस्थिती तर ही आहे की, कोणत्याही प्रकरणाची तक्रारदाराने केलेली तक्रार म्हणजे संबधीत वरिष्ठ अधिका-यांसाठी निश्‍चित लाभ देणारी लॉटरीच असते, हे निश्‍चित झाले.
सन 2021 मध्ये सुभाष मोतीलाल मुथा यांचा ट्रक पकडल्या गेला. आर.टी.ओ. ने त्यावर कारवाई करुन 2 लाख 32 हजार रुपये दंड केला व त्यामध्ये गौनखनिज असल्यामुळे पुढील कारवाई साठी संबंधीत अधिकारी म्हणजे त्यावेळेचे जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. गोसावी यांना हस्तांतरण केला. परंतु तक्रारदाराच्या तक्रारीनूसार तसेचे लोकप्रिय खासदार मा. भावनाताई गवळी यांच्या पत्राला सुध्दा केराची टोपली दाखवून आजपर्यंत त्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही. एव्हढेच नाही तर श्री. मुथा यांना वाचविण्याकरीता चक्क पकडलेल्या ट्रकचे नंबरच बदलवून टाकले. परंतु तरीही त्यांच्यावर खरच कारवाई होईल का ? की अजुनही मोठ्या नेत्याचा फोन अन्‌ कारवाई बंद होईल याकडे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे.