Home विदर्भ अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण ची नवसंकल्प कार्यशाळा संपन्न

अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण ची नवसंकल्प कार्यशाळा संपन्न

92

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नवचैतन , श्रीलंके सारखी देशाची अर्थ व्यवस्था ढासळत चालली आहे देशवासीयांनो सावधान , कांग्रेस कार्यकर्त्यांनो जागे व्हा
नवसंकल्प शिबिरात काँग्रेस कार्यकर्त्यांना बूस्टर डोज

अमरावती-मनिष गुडधे
सध्या भारत देश नवनवीन संकटांना समोर जात अस्तानी देशातील सरकार अराजकतेकडे वाटचाल करीत आहेत त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था सध्या तरी श्रीलंके सारखी ढासळत असून देश वासीनो सावधान व्हा असा काँग्रेस नेत्याचा नारा आज नव संकल्प शिबिरात जोर धरत होता, या नव संकल्प शिबिरातून काँग्रेस कार्यकर्त्यांना नव्या जोमाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना चारी मुंड्या चित्त करण्याच्यादृष्टीने मार्गदर्शकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना चांगलाच बूस्टर डोज दिला, या माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, आमदार बळवंतराव वानखेडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर ,दयारामजी काळे, यांचेसह प्रमुख वक्ते म्हणून उल्हासदादा पवार, लोकेश शेवाडे,राज कुलकर्णी , संजय मिस्कीन ज्येष्ठ पत्रकार , आशुतोष शिरके होते,
यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते उल्हास दादा पवार -यांनी काँग्रेसची विचारधारा ही सर्वधर्मसमभाव असून देशातील गोरगरीब जनतेपासून तर वरच्या घटकापर्यंत काँग्रेसने सर्वांचाच विचार केला आहे, काँग्रेसने कधी जातीपातीचे राजकारण केले नसल्याने आजही देशाला काँग्रेसची च गरज असल्याचे त्यांनी सांगितले,
त्यानंतर ज्येष्ठ विचारवंत लोकेश शेवाळे – यांनी हिंदू मुस्लिम वाद किती खरा व किती खोटा या विषयावर मार्गदर्शन करतानी देशातील सध्याची राजकीय आरजकता म्हणजे देशात जाती-धर्मांमध्ये भांडणे लावून देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले, सध्याचे सरकार हे फक्त एका जातीं धर्माला लक्षित करून देशात फक्त अराजकता माजवून खोटे प्रचार व माध्यमांना हाताशी धरून अपप्रचार करीत आहे त्यामुळे आपण सावधान झाले पाहिजे,
काँग्रेस विचार सेलचे राज कुलकर्णी- यांनी काँग्रेसची देशाला काय गरज या विषयावर प्रखर मत व्यक्त करीत काँग्रेस विचारधारा प्रत्येकांच्या मनात आहे सर्वात प्रथम देश महत्त्वाचा असून देशासाठी काँग्रेसने बलिदान दिले, स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसने लढा उभारला त्यामुळे व आज देशात ७० वर्षात कमावलेले ऐतिहासिक स्थळे व उद्योग दिसत आहेत पण आजच्या मोदी सरकारला हे दिसत नसून फक्त खोटा प्रचार करण्याचे काम सुरू आहेत, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनो जागे व्हा आणि खोटारडे यांना उघडे पाडा असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले,
ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्कीन – केंद्रातील यंत्रणांना हाताशी धरून मोदी सरकार देशात हुकूमशाही चे वातावरण निर्माण करीत असून त्यांचा प्रत्यय महाराष्ट्रात आला आहे त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना नव संकल्प शिबिरातून नवचैतन्य घेऊन जाऊन कामाला लागावे असे आवाहन केले,
माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर- देशातील मोदी सरकारने विरोधकांना संपवण्याचा डाव खेळला आहे जाती-धर्मांमध्ये भांडणे लावून दहशती सारखे वातावरण निर्माण केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले केंद्राप्रमाणे राज्यातही फोडा आणि सोडा अशी भीती वापरली जात आहे या प्रकाराला कोणीही न घाबरता आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी या चिंतन शिबिरातून नवी ऊर्जा घेऊन पुढे येण्याचे आवाहन केले
जिल्हा अध्यक्ष:- जिल्हा काँग्रेस उदयपूर येथील शिबिरातील उत्सव नवचैतन्य बघताना भाजपने आता धास्ती घेतली आहे त्यामुळे खासदार सोनियाजी गांधी व नेते राहुलजी गांधी यांना खोट्या प्रकरणात ईडी लावून चौकशी सुरू केली आहेत प्रत्येक क्षेत्रात फक्त राजकारण व केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग एवढा धंदा भाजपाने सुरू केल्याने आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी जागे होणे आवश्यक असून हा बूस्टर डोज पुढील भविष्यात उपयोगी पडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबलूभाऊ देशमुख, संचालन माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप, आभार प्रदर्शन आमदार बळवंतराव वानखेडे यांनी केले,
यावेळी प्रकाश काळबांडे, हरिभाऊ मोहोड, भैय्यासाहेब मेटकर, जयंत देशमुख, सेवादल अध्यक्ष प्रदीप देशमुख, प्रवीण मनोहरे, प्रदीप वाघ, छायाताई दंडाळे, गणेश आरेकर,संजय वानखडे, अनंत साबळे, गिरीश कराळे, गणेशराव आरेकर,संजय नागणे, महेंद्रसिंग गहरवाल,राजाभाऊ टवलारकर,राजेशभाऊ काळे,श्रीधरराव काळे,विजयराव मडघे, किशोर देशमुख,मुकद्दर खा पठाण,बब्बू भाई इनामदार, विनायकरावजी गवई,बाबुरावजी जवंजाळ,नंदू भाऊ कोठाळे,राहुल घाटे, विनोद पवार ,संजय लायदे,शिवाजी देशमुख,संजय बेलोकार,प्रदीप बापू देशमुख,अमोल देशमुख,अभिजीत देवके,सुनील गावंडे,बाबुरावजी गावंडे, बाबुरावजी जवंजाळ,कैलास आवारे,नामदेवराव तनपुरे,अमोल बोरेकर,पंकज देशमुख, परीक्षित जगताप,सिद्धार्थ बोबडे,पंकज मोरे,तसेच मोठ्या प्रमाणात युवक तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष,महिला काँग्रेसच्या पदाधिकारी जिल्हा काँग्रेसचे हजारो कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.