Home यवतमाळ आयुषी बुंदेला हिचे सुयश…!

आयुषी बुंदेला हिचे सुयश…!

205

यवतमाळ : यवतमाळ येथील महाविर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार बुंदेला यांची मुलगी कु. आयुषी बुंदेला हिने नुकत्याच घोषीत झालेल्या बारावीच्या निकालात चांगले गुण मिळवून स्पृहनिय यश संपादन केले आहे.
कु. आयुषी हि एम.के.एच.संचेती पब्लीक स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय, नागपूरची विद्यार्थीनी आहे. हिला एकूण 600 पैकी 556 गुण मिळाले असून तिला 92.67 टक्के अशी तिला मिळालेल्या गुणांची टक्केवारी आहे. तिला इंग्रजी, अर्थशास्त्र, लेखा व कॉमर्सच्या अन्य विषयात प्राविण्य श्रेणीचे गुण मिळालेले आहेत. तिने सातत्याने अभ्यास करुन परिश्रम घेत हे यश संपादन केले आहे. आपल्या यशाचे श्रेय ती आजी-आजोबा, मामा-मामी, वडील विजय कुमार बुंदेला तसेच मोठी बहिन कु. हेमांशी विजय बुंदेला तसेच गुरुजनांना देते. यवतमाळ शहरातील शैक्षणिक क्षेत्रात तिचे कौतुक केले जात असून अभिनंदनही केले जात आहे.