Home नांदेड सतीगुडा येथे भीषण आग ; अग्निशमन दल वेळेवर पोहचल्याने आग आटोक्यात.

सतीगुडा येथे भीषण आग ; अग्निशमन दल वेळेवर पोहचल्याने आग आटोक्यात.

568

 

सतिगुडा येथे भीषण आग ; गुरांचे ६ गोठे जळून झाले खाक.

प्रतिनिधी : मजहर शेख

नांदेड/माहूर,दि : १० : – माहूर तालुक्यातील मौजे सतिगुडा येथे आज दिनाक १० एप्रिल रोजी सकाळी अचानक लागलेल्या भीषण आगीत गुरांचे ६ गोठे जळून खाक झाले आहेत . ही घटना सकाळी ८ : १५ वाजता घडली .त्यात दोन गोठ्यांत दोन कुटुंबाना बाहेर काढन्यात आल्याने जीवित हानी टळली. परिणामी गावातील माजी सभापती पंचायत समिती माहूर चिंतामण राठोड यांनी या घटनेची माहिती भ्रमधणीवरून राष्ट्रवादी काँग्रेस चे युवानेते विशाल जाधव यांना कल्पना दिल्याने विशाल जाधव यांनी माहूर नगरपंचायत चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना ही माहिती दिली. आणि नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी तात्काळ अग्निशमन गाडी पाठवून दिल्याने. अग्निशमन दलाच्या गाडी वेळेवर पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. या आगीत गुरांचे चार गोठे तसेच दोन गोठ्यातील दोन कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य अक्षरश: जळून खाक झाले आहे .यावेळी जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, सिंदखेड पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.अग्निशमन दलाच्या गाडी वेळेवर पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने या घटने मध्ये काही जीवित हानी झाली नाही.तसेच सतीगुडा गावातील नागरिकांनी विशाल जाधव आणि नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची आभार मानले.