
प्रतिनिधी : मजहर शेख
किनवट : राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दि . ८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा . शरद पवार यांच्या मुंबई येथिल निवास्थान सिल्वर ओक येथे केलेल्या हल्लूयाचा निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष किनवट तर्फे दि . ९ रोजी नोंदवण्यात आला असुन सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले असुन निवेदनात सदर हल्ल्यात सहभागी कर्मचारी व एकुण रचण्यात आलेल्या षडयंत्रा मागील सुत्रधाराला शोधुन त्याला दंडीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे . राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली किनवट तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिका – यांनी निषेध नोंदवला असुन निवेदनाव्दारे सदर घटनेची सखोल चौकशी करुन दोषीं विरुध्द कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे . तर निवेदनावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे साजिद खान , संदिप जोमदे जहिरोद्दीन खान , राहुल नाईक , अजित साबळे , कचरु जोशी , बालाजी बामणे, नागनाथ भालेराव , अश्विन पवार , कैलास जाधव , गोविंद धुर्वे , अमरदिप कदम , अमोल जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .











































