Home मराठवाडा शाळा हे समाज विकासाचे प्रमुख केंद्र- उपसरपंच मनोज गाडे

शाळा हे समाज विकासाचे प्रमुख केंद्र- उपसरपंच मनोज गाडे

413

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत अंगणवाडया आणि प्राथमिक शाळांना साहित्यांचे वाटप

शुक्रवार दिनांक ८ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालय कुंभार पिंपळगावच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगाचे अंतर्गत अंगणवाडी व प्राथमिक शाळांना साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून घनसावंगी पंचायत समितीचे सदस्य अशोक उदावंत, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचपुत्र अन्वर पठाण उपसरपंच मनोज गाडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामविस्तार अधिकारी महादेव रुपणर उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर साहित्य वाटपात जिल्हा परिषद शाळांना ई – लर्निंग मध्ये स्मार्ट एलईडी टीव्ही संच, प्रिंटर, मॉनिटर असे साहित्य वाटप करण्यात आले. गावातील सर्व अंगणवाड्यांना गॅस कनेक्शन, धान्य ठेवण्यासाठी कोठ्या, त्याच प्रमाणे अंगणवाड्यांना पूरक आहार शिजविण्यासाठी भांडे देण्यात आली, सदर कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच मनोज गाढे यांनी शाळा हे समाज विकासाचे प्रमुख केंद्र असून जर शाळांचा विकास झाला तर समाजाचा विकास होईल असे मत मांडले . शाळा विकासाला प्राधान्य देणे गरजेचे वाटते .याप्रसंगी ग्रामपंचायत ग्राम विस्तार अधिकारी महादेव रुपनवर यांनी मनोगत व्यक्त केले .शाळांना लागणाऱ्या सर्व भौतिक सुविधा पुरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी आश्वासित केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुनील खोडदे यांनी केले तर आभार प्रदर्शन लतेश वाईकर सर यांनी केले.या प्रसंगी प्राथमिक शाळा शिक्षक,अंगणवाडी संचालिका यांची उपस्थिती होती.