Home यवतमाळ पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत नागरिकांच्या सोयी साठी सात दिवस फिरते पोलीस ठाणे..!

पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत नागरिकांच्या सोयी साठी सात दिवस फिरते पोलीस ठाणे..!

188
0

➡️ पोलीस विभागाचा स्तुत्य उपक्रम…!

(अयनुद्दीन सोलंकी)

घाटंजी : पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत 102 गांवे असून 42 गांवे सावळी (सदोबा) दुरक्षेत्र भागात आहे. यवतमाळचे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या संकल्पनेतून एक आठवडा फिरते पोलीस स्टेशनचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
पारवा पोलीस स्टेशन हे सर्वदूर पसरलेले असुन आदिवासी समाजाची लोकसंख्या पाहता सांस्कृतिक, सामाजिक, प्रथा परंपरा या मुळे पारवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आदिवासी समाजात जनजागृती व्हावी या साठी पिडीत महीला, मुली, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलें ईत्यादी करिता पारवा पोलीस ठाणे अंतर्गत फिरते पोलीस ठाणे सुरु करण्यात आलेले आहे.
आदिवासी वस्ती, पोड, बंजारा समाजातील तांडा आदीं ठिकाणी जाऊन पारवा विभागातील 60 गांवे व सावळी (सदोबा) दुरक्षेत्र विभागातील 42 गांवे असे प्रत्येक गावांत जाउन दि. 10 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत आठवडाभर फिरते पोलीस ठाणे ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. फिरते पोलीस ठाणे पथकात एक पोलीस अधिकारी, तीन पोलीस अंमलदार, कागदपत्रासह स्टेशन डायरी, आकरंस बुक ईत्यादी राहणार आहे. फिरते पोलीस ठाणे अंतर्गत नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी घेणे, तक्रार देण्यास त्यांची भिती दूर करणे, महिला, विद्यार्थी, बालके, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती ईत्यादी सोबत संवाद साधून तक्रारी जाणुन घेणे, जुने वाद, मतभेद, किरकोळ तक्रारी, हेवे दावे, गटा तटाचे भांडण आदीं उपस्थित लोकांसमक्ष तक्रार समजुन जागेवरच निकाली काढणे, गावांत सलोख्याचे वातावरण निर्माण करणे, गावातील अवैध धंदे जसे दारु, जुगार, वरळी मटका, गुटखा अंमली पदार्थ, अवैद्य दारु निर्मिती व विक्री ईत्यादी चालु आहे वा नाही याची माहिती घेऊन गुन्हे संकलीत करुन माहिती काढणे, गांव पातळीवर नागरिक व पोलीस यांचे मध्ये जवळीक निर्माण करणे, महिला व बालंका विषयक कायदे व शासनाचे धोरणाची जन जागृती करणे, फिरत्या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पोलीसांबद्दल चांगली प्रतिमा निर्माण करणे, आदिवासी मुलां, मुलीं करीता पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन करणे, ग्राम भेट, जातीय सलोखा निर्माण करणे आदीं बाबत बैठक व मार्गदर्शन फिरते पोलीस ठाणे मार्फत करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण, सावळी (सदोबा) दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, सहाय्यक फौजदार बालाजी ससाणे, श्यामसुंदर रायके, रामकृष्ण चौके, सुनिल कुडमेथे, पोलीस पाटील, तंटामुक्त गांव समितीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच आदीं उपस्थित राहणार आहे.

Previous articleशाळा हे समाज विकासाचे प्रमुख केंद्र- उपसरपंच मनोज गाडे
Next article६ वर्षीय चिमुकली ज़िकरा फातेमा ने ठेवला पहिला उपवास ( रोज़ा )
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.