Home विदर्भ पोलीस स्टेशन मंगरूळ दस्त येथे शांतता समिती ची बैठक संपन्न

पोलीस स्टेशन मंगरूळ दस्त येथे शांतता समिती ची बैठक संपन्न

85
0

 

धामणगांव रेल्वे :प्रशांत नाईक

धामणगांव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन मध्ये आज दि.08-04-2022रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी ड्रा. बाबासाहेब आंबेडकर जयंती,, रामनवमी,, हनुमान जयंती या सामाजिक सणाच्या शांतते निमित्त पोलीस स्टेशन मार्फत या मिटिंग चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील,, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष मिटिंग ला आवर्जून उपस्थित होते.यावेळी उपस्थित असलेल्याना मंगरूळ दस्त पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी मार्गदर्शन करून कार्यक्रम कोणत्या पद्धतीने योग्य रित्या पार पडेल याबाबत सूचना दिल्या. तसेच शासनाच्या निर्देशाप्रमाणे भां. द. वी कलम 149नुसार सर्व मंडळाना नोटीस देण्यात आल्या.आगामी येणाऱ्या सामाजिक सनामध्ये जातीय सलोखा राखून कोणतेही वादविवाद न होता उत्साहात ड्रा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येईल असे आश्वासन उपस्थित मंडळ प्रतिनिधी नी दिले. कार्यक्रमाला उपस्थित ठाणेदार. सुरज तेलगोटे, ड्रा. सत्यशील टेम्पे, मंगरूळ दस्त चे सरपंच मा. हजारे व सर्व पोलीस पाटील, मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते

Previous articleशांतता पुर्वक जयंती उत्सव साजरा करा, आम्ही सहकार्य करू-पोलीस अधिक्षक वाशिम
Next articleसतीगुडा येथे भीषण आग ; अग्निशमन दल वेळेवर पोहचल्याने आग आटोक्यात.
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.