Home पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय समाज पक्ष मोहोळ तालुका युवकच्या अध्यक्षपदी दिनेश सातपुते यांची निवड

राष्ट्रीय समाज पक्ष मोहोळ तालुका युवकच्या अध्यक्षपदी दिनेश सातपुते यांची निवड

160

 

पुणे / मोहोळ (प्रतिनिधी) –  राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काशिनाथ नाना शेवते आणि रासपचे महाराष्ट्र मुख्य महासचिव म्हणून ज्ञानेश्वर माऊली सलगर यांची निवड झाल्याने राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सत्कार समारंभ आणि कार्यकर्ता मीटिंग आयोजित केली होती.यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या मोहोळ तालुका युवक अध्यक्षपदी दिनेश सातपुते यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीचे पत्र राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते,मुख्य महासचिव माऊली सलगर यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.मोहोळ तालुक्यातील युवकांचे मूलभूत प्रश्न, समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अथक प्रयत्न करणार असल्याचे मत नूतन मोहोळ तालुका युवक अध्यक्ष दिनेश सातपुते यांनी सांगितले आहे.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते,मुख्य महासचिव माऊली सलगर,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, सोलापूर जिल्हा प्रभारी रणजित सूळ, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, परमेश्वर पुजारी जिल्हा उपाध्यक्ष, गोरख वाकडे जिल्हा उपाध्यक्ष,अभिमान काळे मोहोळ तालुका प्रभारी, मोहोळ तालुका अध्यक्ष नवनाथ लेंगरे, विधानसभा अध्यक्ष नागेश हजारे, लक्ष्मण बरकडे,भुजंग मळगे,बाळासाहेब दाइंगडे, देवा जानकर, संगीता वाघमोडे, सलगर मॅडम, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
या मिटिंगमध्ये सोलापूर महानगरपालिका निवडणूक,मोहोळ नगरपरिषद व सोलापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली, तसेच जिल्ह्यातील सर्व निवडणूका राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.