
देऊळगाव माळी , ( कैलास राऊत ) ता. २मार्च – ” *नकोस घाबरू उगाच पथिका मलाही चैतन्य होते, तुझ्याच सारखे मलाही एकदा यौवन लावण्य.”…….. कविश्रेष्ठ ना. घ. देशपांडे यांचे हे शब्द एका वाड्याची कथा आणि व्यथा सांगतात.

कंचनीचा महाल! मेहकर शहराच्या उत्तरेला जानेफळ मार्गावरील ही एक भग्न वास्तू. या वाटेवरून जाणाऱ्या प्रत्येकाला खुणावते. गतकाळाची घरभरली हकीकत सांगते. उपेक्षेच्या वेदना सहन करीत उरलासुरला हा ‘महाल’शेवटच्या घटका मोजत आहे.. ज्या शारंगधर नगरीला ऐतिहासिक वैभव प्राप्त झालं त्याच वैभवा साठी मेहकर शहरातील भूमिपुत्र कृतिशील शिक्षक विजय आसाराम फंगाळ व त्यांचे सहकारी मागिल गेल्या आठ ते दहा महिन्यापासून सातत्याने मेहनत घेऊन कंचनी एक रहस्यमय स्वप्न कथा या लघुपटाच्या निर्मितीसाठी सातत्याने जिव ओतुन करत आहे खरंतर ग्रामीण भागात चित्रपट निर्मिती करणे व त्याला जनाधार मिळवणे ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे, परंतु ही अशक्य वाटणारी गोष्ट विजय फंगाळ व सर्व सहकारी कलावंतांनी शक्य करू दाखवली कंचनीचा महाल
या वास्तूबाबत आम्हला लहानपणापासून एक गोष्ट सांगितली जाते. ती अशी, ‘कंचनी खूप सुंदर व देखणी होती.

मेहकरजवळील तिच्या महालात नृत्य दरबार असायचा. अनेक राजपुत्र, श्रीमंत, रसिक हजेरी लावत. तिच्यात अहम्भाव आला. आपल्या महालावरून जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील कमळजा देवीच्या मंदिरातील दिवा पाहण्याची शपथ घेतली. महालाचे सात माळे बांधून पूर्ण केले. ती सातव्या माळ्यावर गेलीदेखील. तिला दिवा दिसला. मात्र हा दिवा दिसताच ती दगडाची शिळा होत महालावरून खाली कोसळली’. या कंचनीच्या मनातील भावविश्व उलगडताना नाघं लिहितात, ‘नकोस घाबरू उगाच पथिका मलाही चैतन्य होते, तुझ्याच सारखे मलाही एकदा यौवन लावण्य होते!’चित्रपट बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं वस्तुनिष्ठ मांडणी व तेवढ्याच उत्तम दर्जाचे संगीत, कथा, पटकथा, संवाद ,व छायाचित्रण करून या लघुपटाची निर्मिती करत असतानाच एक सामाजिक उत्तरदायित्वाची भावना मनाशी बाळगून इतिहासाचे धडे शिकविता शिकवीता इतिहासाची संवर्धन करण्यासाठी धडपडणार्या विजय फंगाळ या ध्येयवेड्या शिक्षकाची कंचनीचा महाल संवर्धनाची महत्वकांशी चा विजय हा सर्वसामान्य जनतेच्या व लोकप्रतिनिधी घ्या पुढाकार याशिवाय होणार नाही हे मात्र निश्चित त्यासाठीच
पुरातत्त्व खात्याने हा महाल ताब्यात घेऊन त्याचे जतन करावे, अशी जुनी मागणी आहे. यांनी या महालाच्या संवर्धनासाठी काही वर्षांपूर्वी उपोषण केले होते. नंतर एक चौकीदार नेमला गेला. काही दिवसांतच हा चौकीदारही गायब झाला. आज महालाची पडझड झाली असून दोनच मजले सध्या अस्तित्वात आहेत. या महालाबद्दलची उत्सुकता आजही कायम आहे.
यासाठीच मेहकर शहराच्या वैभवात भर घालणारा कंचनीचा महाल वाचला पाहिजे व त्याचे पुरातन खात्याने लोकसहभागातून का होईना संवर्धन केले पाहिजे यासाठीच मेहकर शहरातील तालुक्याचा भूमिपुत्र शिक्षक कथा,पटकथा,निर्माता,दिग्दर्शक
विजय आसाराम फंगाळ,
सहाय्यक दिग्दर्शक राहुल उमक, कलाकार नेहा काळे,वैशाली सावजी,सिद्धार्थ जाधव,राहुल उमक,मनोहर म्हळसणे,किरण कानोडजे,सोनल ,सास्ते,विठ्ठल खरात,जयदेव हेंद्रे,वेदकाटकर,सायली फंगाळ,प्रशिका ताजने,शिवराज फंगाळ,अश्वजित गवई,विनोद सौभागे,संस्कृती काटकर,दुर्गा काळे,पार्वती धोटे सहसर्व सहकारी कंचनीचा महाल वाचला पाहिजे त्याचे संवर्धन झाले पाहिजे व येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचा अभिमान वाटावा यासाठीच हा सर्व खटाटोप लघुपटाच्या माध्यमातून वरील सर्व मंडळी करत आहे, मेहकर व परिसरातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व इतिहासप्रेमी व आपल्या भूमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट बघावा कारण पुढच्या पिढीला कांचनी कोण होती याची पुरेपूर माहिती सर्वांना म्हणजेच लहान मुले असेल वयस्कर मंडळी असतील त्यांना भावी काळात कुठेतरी मेहकरच्या वैभवात भर घालणाऱ्या परंतु आत्ता पडपड झालेल्या कंचनीचा महाल पुन्हा एकदा नव्या समृद्ध रूपात उभा राहावा व इतिहासाच्या पानावर ज्या सुवर्णाक्षरांनी मेहकर चा इतिहास लिहिला गेला त्याच तोलामोलाचे कार्य इथून पुढच्या पिढीला माहित व्हावं व आकलन व्हावं यासाठी कंचनीचा महालाचा संवर्धन झालं पाहिजे त्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार होणे आज काळाची गरज आहे यासाठी सर्वांनी कंचनीचा महाल एक रहस्यमय स्वप्न कथा हा चित्रपट जरूर बघावा व ज्या भूमिपुत्रांनी आपल्या अभिनयाचं कौशल्य पणाला लावून उत्कृष्ट असा अभिनय या लघुपटात करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येकाने एकदा हा चित्रपट बघावा मेहकरच्या इतिहासिक वैभवाला आपल्या साहित्य लेखनातून सोनेरी मुलामा चढवणारे ना.घ देशपांडे यांना जाऊन दोन दशके उलटून गेलीत, त्यांचे स्मारक उभरण्याची तत्परता कुणी दाखविली नाही. कंचनीच्या महालाची उपेक्षा या स्मारकाच्या वाट्याला येणार की ‘चैतन्य’ लाभणार हा विचार आताच्या पिढीला करणे ही काळाची गरज आहे . चौकट (प्रतिक्रिया ).” स्थानिक मेहकारातील सर्व जनतेने पुढाकार घेऊन पुरातन खात्याला कंचणीच्या महालाची दखल घेऊन शासनाला तो महाल संवर्धन करण्यासाठी भाग पाडले पाहिजेत इतकीच इच्छा………निर्माते .विजय आसाराम फंगाळ











































