Home बुलडाणा शिरपूर येथे महाशिवरात्री व एकलव्य जयंती उत्सव साजरी

शिरपूर येथे महाशिवरात्री व एकलव्य जयंती उत्सव साजरी

391

 

बुलढाणा प्रतिनिधी/रवि अण्णा जाधव
शिरपूर येथे दि 01/03/2022 वार मंगळवार रोजी बुलढाणा तालुक्यातील शिरपूर येथे महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंती निमित्त विविध कार्यक्रम पार पाडण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता शिरपूर गावातील महापुरुषांच्या स्मारकाना मा. जि. प.सदस्य नरेश भाऊ शेळके,संरपंच सौ दुर्गाबाई दिनकर शेळके, अशोक गव्हाणे व भिल्ल समाज बांधवांनकडुन हार अर्पण करून ग्रामपंचायत कार्यालय मध्ये विर एकलव्य याचें पुजन करण्यात आले व त्यानंतर ठीक 2 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली, सुरवात सर्वप्रथम दीप प्रज्वलनाने केली दीप प्रज्वलन हे मा. आमदार सौ. श्वेता ताई महाले पाटील व सौ .जयश्री ताई शेळके व मधुकर तेजराव पवार एकलव्य संघटनेचे प्रदेश सचिव तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ दुर्गाबाई दिनकर शेळके,उपसरपंच सौ मिना मधुकर पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर भगवान विर एकलव्य, भगवान महादेव,बिरसा मुंढा, तंटया मामा,उमाजी नाईक, याचे पुजन करून,..मा आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी आदिवासी समाज हा संघटीत होऊन राजकीय,शैक्षणिक,प्रवाहा मध्ये उतरला पाहिजे असे आवाहन केले शासकीय योजने पासून दूर राहिलेल्या आदिवासी भिल्ल समजाला योजनेचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन दिले, जि. प.सदस्य सौ जयश्री ताई शेळके यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की महाराष्ट्रात आदिवासी भिल्ल समाज मोठ्या प्रमाणात असून शासनाकडून आदिवासी समाजा साठी दर वर्षी आदिवासी च्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्या जाते परंतु आज पर्यंत आदिवासी भिल्ल समाजाला योजनेचा लाभ मिळाला नाही

यांची खंत व्यक्त केली असुन भिल्ल समाज विकासा पासून वंचित राहिला आहे भिल्ल समाजाने आपल्या न्याय व हक्कासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले,यावेळी ज्ञानेश्वर सुसर नंदुरबार सुसर ग्रापंचायत सदस्य जनार्धन सुसर, डिगाबर शेळके, तेजराव शेळके, दत्तु हिवाळे, सौ. माधुरी शिवाजी शेळके, शरद शेळके, अकुश सुसर, राजु शेळके,सुवर्णा हिवाळे व एकलव्य संघटनेचे पदाधिकारी नितेश बरडे,ललिता पवार,सपना गायकवाड,विकी गायकवाड, ,कीसन मोरे, पिंटू विरे,सुनील पवार, पंजाबराव पवार, भगवान पवार, तसेच मा. उपसरपंच दिलीप सुसर, राजु सुसर, व गावकरी मंडळी, भिल समाज बांधव एकलव्य उत्सव समीती शिरपूर उपस्थित होते, त्यानंतर प्रस्तावना अरूण शेळके यांनी केले व सुत्रसंचालन पंजाबराव निकाळजे यांनी केले, त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली, शेवटी आभार मधुकर पवार यांनी केले..