Home मराठवाडा शिवरात्री म्हणजे तिमिराकडून तेजाकडे जाण्याचे पर्व – प्रज्ञा दीदी

शिवरात्री म्हणजे तिमिराकडून तेजाकडे जाण्याचे पर्व – प्रज्ञा दीदी

243

 

जालना-लक्ष्मण बिलोरे

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारा आयोजित आजादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर च्या अंतर्गत ८६ त्रिमूर्ती शिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे ब्रह्मकुमारी सेवा केंद्र संचालिका यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केले. महाशिवरात्रीचे महत्त्व सांगताना प्रज्ञा दीदी म्हणाल्या शिवाची आराधना केल्यास मनोवांछीत फल प्राप्त होते. शिव हे निराकार परमात्मा आहे आणि शंकर हे आकारी देवता आहे. शिव आणि शंकर एक नसून वेगळे आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक ए. राजा म्हणाले सकारात्मक विचाराचा अवलंब करा त्यानेच यश प्राप्त होते. केवळ स्वतःपुरता विचार न करता देश हिताचा व समाजहिताचा विचार करा.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सडक सुरक्षा सप्ताह निमित्त ७५ मोटारसायकल रॅलीचे त्यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. रॅलीमध्ये युवकांना व समाजाला मोबाईलचे दुष्परिणामाचे फलक व घोषवाक्य द्वारे जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सेवा संचालिका ब्रह्मकुमारी अंजू दीदी, माजलगाव सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी अनिता दीदी बी.के.अमित बी.के. प्रितेश, बी.के. गोरख ,बी.के.रवींद्र, बी.के. बालाजी, बी. के. केशव बादाडे आदि बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.