Home जळगाव डॉ.तांबेंमुळे विनाअनुदानित शिक्षकांचे पगार सुरू झाले – शैलेश राणे

डॉ.तांबेंमुळे विनाअनुदानित शिक्षकांचे पगार सुरू झाले – शैलेश राणे

229

रावेर (शेख शरीफ)
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य आमदार डॉ.सुधीरजी तांबे रावेर तालुका दौ-यावर असतांना शिक्षण विकास मंडळ विवरे संचलित श्री.ग.गो.बेंडाळे हायस्कूल विवरे येथे सदिच्छा भेट दिली.
पदवीधर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री धनजी लढे होते.पदवीधर मेळाव्याचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव शैलेश राणे यांनी केले.प्रास्ताविकातून गेल्या २० वर्षांपासून ज्युनियर कॉलेजमधील विनाअनुदानित शिक्षक बांधवांचे पगार आ.डॉ.तांबे यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाले.पदवीधरांच्या अनेक समस्या त्यांनी सोडविल्या.डॉ.तांबे आपल्या मनोगतातून सांगतांना विनाअनुदानित तत्व कायमचे संपविले पाहिजे त्यासाठी मी विधीमंडळात प्रयत्न करीन तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या थकीत वैद्यकीय बिले,रखडलेली भरती प्रक्रिया,वेतनेतर अनुदान,पायाभूत पदे,वैयक्तिक वाढीवरील तुकड्या,अनुदान अशा अनेक शैक्षणिक समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले या सदिच्छा भेट प्रसंगी श्री.ग.गो.बेंडाळे हायस्कूल मधील कलाशिक्षक अर्जुन जे. सोळुंके सर यांनी स्वतः रेखाटलेले डॉ. तांबे यांचे पेन्सिल स्केच सप्रेम भेट दिले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मार्तंड भिरूड, उपाध्यक्ष मनोहर राणे, व्हा.चेअरमन रामचंद्र देशमुख, सचिव शैलेश राणे, जेष्ठ संचालक,वसंत राणे,गोपाळ राणे,रमेश पाचपांडे,किरण पाचपांडे,केशव राणे,शाळेचे मुख्या.ए.जी.महाजन पर्यवेक्षक एस.व्ही.येवले प्राथ.मुख्या.सौ.हर्षा बेंडाळे सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर बंधू उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पर्यवेक्षक एस.व्ही.येवले यांनी तर आभार अर्जुन सोळुंके यांनी मानले.