Home विदर्भ विर्दभ बळीराजा प्रकल्पग्रत कृषी संघर्ष समिती तर्फे संपूर्ण विदर्भा मध्ये सिंचन प्रकल्पावर...

विर्दभ बळीराजा प्रकल्पग्रत कृषी संघर्ष समिती तर्फे संपूर्ण विदर्भा मध्ये सिंचन प्रकल्पावर एक दिवशीय सांकेतिक सत्याग्रह आंदोलन

431

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

अमरावती -: आज दि २४ दिसे रोजी करण्यात आले .त्याच पाश्वभूमी वर अमरावती जिल्हातील भातकुली तालुक्यातील निम्न पेढी प्रकल्प मौजा बोंडेवाडी येथे हजारोच्या संख्येने विर्दभ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृषी संघर्ष समिती चे अध्यक्ष यांच्या उपस्थित हे सांकेतिक सत्याग्रह आंदोलन पार पडले .प्रकल्पग्रस्त आंदोलन कर्त्याच्या प्रमुख मागण्या अश्या -: १.उमाबॅरेज प्रकल्प अकोला या प्रकल्पाला ज्या प्रमाणे ८.२६ लक्ष रुपये विशेष बाब म्हणून लागू केले, त्या अनुषंगाने निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांना त्याचा लाभ देण्यात यावा.२.निम्न पेढी प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती शासनाने सरळ पद्धतीने घेतली त्या शेतकऱ्यांचा एक धरण एक न्याय या तत्वावर विचार करून निर्णय घेण्यात यावा. ३.निम्न पेढी प्रकल्पामध्ये गुणक १.५० प्रमाणे १५ दिवसाच्या फरकाने शासनाने शेतकऱ्यांंच्या शेती संपादन केल्या आहेत.त्या शेतकऱ्यांना गुणक २ लागू करून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा.४.निम्न पेढी प्रकल्पातील भोगट क्र.२ मधील ६९ शेतकऱ्यांची शासनाने जी रक्कम स्वतःकडे जमा ठेवलेली आहे त्याची रक्कम त्यांना परत करावी.५.निम्न प्रकल्पग्रस्त नागरिकांना सरसकट घरकुलचा लाभ देण्यात यावा व घरकुलची रक्कम हि प्रकल्पग्रस्त असल्यामुळे एक रकमी देण्यात यावी. ६. पुर्नवसन पूनर्वसाहत स्थापना करत असताना 26 नागरी सुविधा अंतर्गत करण्यात यावे. ७.मौजा वासेवाडी गावातील शेतकऱ्यांची ९५% शेती प्रकल्पामध्ये गेली आहे त्याकरिता त्याचे पुनर्वसन करण्यात यावे .८.प्रकल्पग्रस्त करिता शासकीय सेवेत सामावून घेण्याची कायदेशीर तरतूद 5% वरून 15% पर्यन्त करण्यात यावे. ९. मौजा गोपगव्हांन गावातील ९ नागरिकांचे मालकीचे घर असताना ते शासकीय मालमत्ता दाखवण्यात आली आहे तरी ते दुरुस्त करून देण्यात यावे .१० .प्रकल्पातील प्रलंबित भूखंड वाटपाविषयीचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावे. ११ .गोपगव्हांन या गावातील नागरिकांचे घराचे पैसे १.५० या गुणकने मिळाले आहे त्यांना २ च्या गुणकाप्रमाणे फरकाची रक्कम तत्काळ देण्यात यावी .या मागण्याबात शासनाने तात्काळ निर्णय देण्यात यावे अशी मागणी प्रकल्पग्रस्त नागरीकडून करण्यात आली. सांकेतिक सत्याग्रह व्दारे जनप्रतिनीधी , शासन व प्रशासनास प्रकल्पग्रस्तांचा गर्भित इशारा अध्यक्ष यांनी दिला. या सांकेतिक सत्याग्रह आंदोलनाला मोठ्या संख्यने महिला पुरुष तसेच लहान मुले सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या सांकेतिक सत्याग्रह आंदोलनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधळे काका , विर्दभ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृषी संघर्ष समिती अध्यक्ष मनोज चव्हाण , गौतम खंडारे ( सरपंच अळणगांव), अविनाश संके सरपंच वासेवाडी, भरणारे भाऊ सरपंच हातूरणा , मंगेश पेढेकर सरपंच गोपगव्हांन , शंकर तायडे उपसरपच अळणगांव , संदीप मेटांगे ,श्रीकृष्ण बैलमारे , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.