
प्रतिनिधी -प्रशांत नाईक (साप्ताहिक पोलिसवाला )
धामणगाव रेल्वे – आज दि.20 ऑक्टोबर रोजी ग्राम पंचायत निंबोली येथे ग्राम सभा घेण्यात आली त्या मध्ये निंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते उच्च शिक्षित असलेले अमोल दिगांबर विरुळकर यांची सर्वानुमते निंबोली येथील रोजगार सेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली .व त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वी कडे अभिनंदन होत आहे.व अमोल विरुळकर यांच्या नियुक्ती मुळे युवा वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण आहे. अमोल भाऊ विरुळकर यांनी त्यांच्या नियुक्ती चे श्रेय सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ सोनोने व गावातील सरपंच राजू भाऊ नेवारे, उप सरपंच अंकुश बऱ्हाणपुरे व सदस्य विजय भाऊ कडू,यांना दिले आहे.व गावातील सर्व जनतेने जो माझ्या वर विश्वास दाखविला त्या बद्दल जनतेचे आभार मानले आहे.










































