Home महत्वाची बातमी चंदेरी दुनियाचे सुप्रसिध्द कला दिग्दर्शक लिलाधर सावंत यांचे निधन

चंदेरी दुनियाचे सुप्रसिध्द कला दिग्दर्शक लिलाधर सावंत यांचे निधन

283

 

फुलचंद भगत
वाशिम:-चंदेरी दुनियाचे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक लीलाधर सावंत याचं दीर्घ आजाराने वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले आहे.
मूळचे सिंधदुर्ग चे असलेले लीलाधर सावंत पुढे वाशिम जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यात असणार्‍या जऊळका रेल्वे येथे वास्तव्यास होते.यांनी अनेक चित्रपटानां आपल्या कला मधून सजवले होते सागर’ या सुपरहिट चित्रपटाच्या यशानंतर प्रकाशझोतात आलेल्या लीलाधर सावंत या आर्ट डायरेक्टरनं चंदेरी दुनियेत आपली एक वेगळी छाप सोडली होती. शहशाह’, ‘दिवाना’, ‘क्रांतिवीर’, ‘हत्या’, ‘जिद्दी’, ‘सलाखे’, ‘अनाडी’, ‘मै खिलाडी, तू अनाडी’, 100 डेज’ अशा एकेक करीत तब्बल 177 हिंदी चित्रपटांचे आणि चार हॉलिवूडच्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन या अवलियाने केलेले आहेय. लीलाधर सावंत यांचा वर्ष १९८८ मध्ये ‘हत्या’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरव झाला. दरम्यान, ‘कामचोर’साठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. गेल्या काही महिन्या पासून ते आजारी होते लीलाधर आजारी होते उपचारा दरम्यान आज दीड वाजता च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पुष्पा सावंत आहे.