Home विदर्भ दारव्हा शहरातील पुसद बायपास ते अंबिका मंदिर पर्यंत रोडचे कॉंक्रेटीकरण करा.

दारव्हा शहरातील पुसद बायपास ते अंबिका मंदिर पर्यंत रोडचे कॉंक्रेटीकरण करा.

201

दारव्हा नगर परिषदेला बहुजन मुक्ती पार्टीची मागणी.


यवतमाळ / दारव्हा (प्रतिनिधी) :-गेल्या काही महिन्यांपासून दारव्हा दिग्रस व दारव्हा शहरातील मुख्य मार्गाचे दुपदरीकरण व खोदकाम व बांधकाम सुरू असल्यामुळे सध्याची वाहतूक पुसद बायपास ते अंबिका मंदिर रोड येथून सुरू आहे परंतु त्या रोडची अत्यंत दुरवस्था झालेली दिसून येत आहे.रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता समजून येत नाही त्यामुळे त्यारोडचे कॉंक्रेटीकरण करून नागरिकांना सुयोग्य असा रस्ता निर्माण करून देण्यात यावा.अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मा.बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांच्यासह सिद्धार्थ मेश्राम (दारव्हा शहराध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी),प्रशांत ठाणे,आशिष फुसांडे,रमेश कांबळे,रामेश्वर राठोड,प्रकाश वासनिक,कुशल शंभरकर, उंकडा भगत,अंबादास जाधव,अशोक खंडारे, गोपाल चोल्हे,विनय पिंगाने,कैलास चव्हान,सुनील फुसांडे,प्रवीण ठवरे, संतोष खंडारे, करण खंडारे, संतोष इंगोले पाटील,राहुल मनवर यांच्यासह अनेकांनी दारव्हा नगर परिषदेला रस्ता दुरस्तीची मागणी केली आहे.