Home जळगाव रावेर वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसिलदार यांना महाराष्ट्र बंदचे निवेदन सादर

रावेर वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसिलदार यांना महाराष्ट्र बंदचे निवेदन सादर

156

शरीफ शेख

रावेर , दि. २५ :- येथे वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे महाराष्टातील विविध सामाजिक संघटना राजकीय संघटना आणी कामगार संघटनाच्या वतीने सी.ए.ए.,एन आर सी व एन आर पी आणी भारत सरकारच्या आर्थीक दिवाळखोर विरोधात व निर्गुतणूक धोरण विरोधात आज दि २४ जानेवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ याचे तर्फे रावेर नायब तहसिलदार संजय तायडे यांना निवेदन देण्यात आले. या बंदला रावेर तालुका कॉग्रेस पक्ष, ऑल इंडिया मसजिद ए इलेहादुल मुस्लीमिन ,रावेर तसेच मुस्मीम पंच कमेटी रावेर यांचा जाहिर पाठींबा आहे.

वरील निवेदनावर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे,कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,मुस्लीम पंच कमिटीचे शे.गयास शे.रशिद एम.आय.एम.चे शे. वसिम, राजुभाऊ खिरवडकर,नुरा तडवी,वचितचे सुरेश अटाकाळे,मा. नगरसेवक महेंद्र गजरे,वंचितचे बाळा शिरतुरे,राहुल डी.गाढे, विनोद तायडे, अशोक शिरतुरे, दौलत अढांगळे, नितीन तायडे, भिमराव तायडे, सै.आरिफ

सै.मोहम शे. नासिर शे. कालु, शे.रफीक,गौतम अटकाळे, इसुफ खान, विकास सवर्णे, शे. जावेद ,रविंद्र भिल्ल,यांच्यासह असंख्ये बहुजन कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.