Home मराठवाडा किनवटमध्ये पाणीटंचाई आराखडा बैठक

किनवटमध्ये पाणीटंचाई आराखडा बैठक

130

मजहर शेख

नांदेड . किनवट , दि. २५ :- आपल्या परिसरातील उपलब्ध पाणी स्त्रोताचा विचार करून नियोजन केल्यास संभाव्य पाणी टंचाईवर सहज मात करता येईल म्हणूनच दोन महिने आधी आपण बैठक घेत आहोत, असे प्रतिपादन आमदार भिमराव केराम यांनी केले.
पंचायत समिती, किनवटच्या वतीने गजानन महाराज मंदीर सभागृहात आयोजित ‘ पाणीटंचाई आराखडा बैठकीचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी तहसिलदार नरेंद्र देशमुख, सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, उपसभापती कपील करेवाड, प्रकल्प स्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष भगवान हुरदुके, माजी सभापती प्रतिनिधी नारायण राठोड, माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील , आईटवार, पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले,इंदल राठोड, सत्यनारायण सुंकरवार, माधवराव डोखळे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, माजी पं.स., सदस्य नारायण दराडे, शेतकरी नेते त्रिभ्वनसिंह ठाकूर, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कार्यकर्ते डॉ. नामदेव राठोड, आदिवासी विद्यार्थी कृती समिती राज्याध्यक्ष विकास कुडमते, संदीप केंद्रे आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. उपविभागीय अभियंता एन.एम. शास्त्री यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. पुढे आमदार केराम म्हणाले, गाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती पाणी विषयक विकासकामे मार्गी लावण्याची ही नामी संधी आहे.ती दवडवू नका. पुन्हा पाण्याचे दुर्भिक्ष झालं म्हणून ओरड करणे गैर आहे. त्याच बरोबर त्यांनी असे आवाहन केले की, ओल्या दुष्काळाची भरपाई प्रधानमंत्री विमा योजना निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, तेव्हा ग्रामसेवक, तलाठी यांनी शेतकऱ्यांचे खाते अपडेट करावेत.
तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी प्रधानमंत्री योजनेचा गावनिहाय आढावा घेतला. शेतकऱ्यांचे खाते आधारलिंक करून घेण्याची जबाबदारी ग्रामसेवक व तलाठी यांचेवर असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचं औचित्य साधन जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त संदीप अंभोरे, अतुल गावंडे, प्रेम गुट्टे, सुधाकर वाघमारे, संतोष ताडेवार, कालेखान पठाण, डी.एस. गट्टुवार, मधुकर पाटील, सारीका अटकोरे, एम.के. खतगावे, मिलिंद जोंधळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष एल. के. राठोड, सचिव संतोष ताडेवार, सरपंच -उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रमसिंग जाधव व माजी उपसभापती आईटवार यांनी आमदार भिमराव केराम यांचा सत्कार केला.
बैठकीच्या यशस्वीतेसाठी शाखा अभियंता निवेदिता बनसोडे, एम.के. सय्यद, आर.जी. स्वामी, प्रकाश टारपे, तारतंत्री अप्पाराव जाधव, विस्तार अधिकारी कैलास रेनेवाड, सुशिल शिंदे, देविदास उडतेवार, साईनाथ चिंतावार, दत्तात्रय उपलेंचवार आदिंनी पुढाकार घेतला.या बैठकीस तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी बहुसंखेनं उपस्थित होते.