
मौलाना कलिंम सिद्दीकी यांची तात्काळ सुटका करा अन्यथा आंदोलन ,
सय्यद तौफिक
लोणार
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने प्रसिद्ध इस्लामिक विद्वान मौलाना कलीम सिद्दीकी यांना मंगळवारी २१ सप्टेंबर २०२१ रोजी मेरठ मधून अटक केले होते त्या निषेधार्थ लोणार येथील मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी २४ सप्टेबर रोजी मा.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मा.तहसीलदार सैफन नदाफ यांच्या मार्फत निवेदन देऊन निदर्शने करण्यात आले.
धर्माचा प्रचार करण्याच्या आणि जबरदस्तीने धर्मांतराच्या प्रकरणात मौलाना यांना अटक करण्यात आले आहे ही अटक भारतीय संवैधानचे आर्टिकल २५ च्या मूलभूत अधिकाराविरूद्ध आहे जी प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वातंत्र्याची हमी देते आणि धर्म स्वीकारणे, आचरण करणे आणि प्रचार करण्याचा हक्क देत आहे. ही केवळ अटक नाही तर धार्मिक उपक्रम दडपण्याच्या उद्देशाने भारतीय अल्पसंख्याकांवर हल्ला असल्याचे सांगण्यात आले आहे. मौलानाचे कार्य समाजातील सर्व घटकांना परिचित आहे आणि उत्तर प्रदेश एटीएस ज्या प्रकारे शांतताप्रेमी मौलाना कलीम सिद्दीकी यांना खोट्या प्रकरणात खेचत आहे ते घृणास्पद आणि निंदनीय आहे. ते एक सुप्रसिद्ध, प्रिय आणि आदरणीय समुदाय नेते आहेत असे निवेदनात नमूद आहे.
मुस्लिम विद्वान, मुस्लिम विद्यार्थी आणि मुस्लिम कार्यकर्त्यां विरुद्ध पद्धतशीरपणे चाललेला षड्यंत्र थांबला पाहिजे,अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. या अटकेचा सर्वांनी तीव्र निषेध केला. यावेळी हाजी मोहम्मद रिजवान रिजवान जड्डा संपादक जेयष्ठ पत्रकार लुकमान अहेमद कुरेशी, वसीफ अहमद खान, रिजवान खान करामत खान, हाफिज शेख आयाज, शेख फहीम सर सह बहुसंख्येने मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते.











































