Home बुलडाणा रताळी येथे कोविड जनजागृती कार्यक्रम सम्पन्न ,

रताळी येथे कोविड जनजागृती कार्यक्रम सम्पन्न ,

184

 

 

बुलडाणा ,
साखरखेर्डा , येथून जवळच असलेल्या रताळी येथे युनिसेफ महिला आर्थिक विकास मंडळ बुलडाणा यांच्या विधमाने लोकसंचालीत साधन केंद्र साखरखेर्डा अंतर्गत रताळी येथे ग्राम पंचायत च्या सहकार्याने कोविड 19 जन जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील कर्तवयदक्ष सरपंच सौ , अलकाताई लव्हाळे ह्या होत्या ग्राम सेवक रतीलाल सिंग ठाकूर उपस्थित होते , या वेळी मास्क वापर , सॅनिटायजर चा उपयोग करा सोशल डिस्टनसिंग चा पालन करा सर्वांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा आदी विषयावर चर्चा करण्यात आली रताळी या गावात सरपंच अलकाताई यांच्या मार्गदर्शनात आता पर्यंत लसीकरणाचे चार कॅम्प घेण्यात आले असून या शिबिरात जवळपास 700 गावकऱ्यांनी लसीकरणाची लाभ घेतला आहे , गावात जर कोविड मूळे कोण्याच्या पतीचे कोणाच्या बापाचे निधन झाले असून मुले अनाथ झाले असतील तर त्यांनी साखरखेर्डा लोकसंचालीत साधन केंद्र येथे माहिती द्यावी नाव नोंदणी करावी असे आवाहन येथील वयवसथापक आशा सरकटे यांनी केले आहे ,

 

 

आय.डी सहयोगीनी गोदावरी इंगळे.फिल्ड सहयोगीनी रेखा पवार. व आशा राजगुरू. राताळी गाव प्रतिनिधी पुष्पा सरकटे. युनिसेफ सी आर पी ज्योती जाधव. राताळी येथील बचत गट अध्यक्ष व सदस्य बचत गट प्रज्ञा शिल करूना बचतगट मायावती बचतगट.कृष्णाई बचत गट, माया रमाई बचतगट, राजलक्ष्मी बचतगट, एकलव्य बचत गट, तेजस्विनी बचतगट, विठु माऊली बचतगट, जिजाऊ महिला बचत गटाच्या प्रतिनिधी हजर होत्या. यावेळी गावातून जनजागृती रैली काढण्यात आली या वेळी सर्व महिलांनी घोषणा देऊन कोरोनापासुन बचाव साठी जनजागृती केली. कार्यक्रम नियोजन रेखा पवार व ज्योती जाधव यांनी केले. या कार्यक्रमा साठी राताळी ग्रामपंचायतचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन रेखा पवार यांनी केले.