Home विदर्भ खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडी ची कार्यवाही

खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडी ची कार्यवाही

828

 

वाशिम , यवतमाळ येथील संस्थान चे समावेश ,

वाशिम , पोलीसवाला न्युज नेटवर्क ,

जो भाजप सोबत नडला त्याला ED च्या नोटीस किंवा धाडसत्र हे सूत्र सध्या राज्यात दिसून येत आहे, काल शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी नोटीस जारी केल्यानंतर आज आणखी एका शिवसेना नेत्यावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या. खासदार भावना गवळी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने धाडसत्र सुरू असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.
भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून यात वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे.

मागील आठवड्यात भाजपा नेते किरीट सोमय्या हे वाशीम दौर्यावर आले असता त्यावेळी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केला होता.
यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता