Home विदर्भ तब्बल सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

तब्बल सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

144

इकबाल शेख – वर्धा

तळेगांव पोलीसांचे मोठे यश

तळेगाव शामजी पंत : तळेगाव पोलिसांच्या हाती एक मोठे यश हाती लागले असून यामध्ये सहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात तळेगाव पोलिसांना यश आले आहे. 2015 पासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने यवतमाळ येथून अटक केली आहे या मधील आरोपी हा 2011 ते 2014 पर्यंत डाकपाल म्हणून पारडी येथील डाक केंद्रात काम करत होता यादरम्यान तीन खाते धारकांच्या खात्यातून 7360 आणि शाखेतील सहा हजार 87 रुपये असा एकूण 13417 रुपये ची अफरातफर करून हा आरोपी 2015 पासून फरार होता या आरोपीविरुद्ध तळेगाव पोलिस ठाण्यात 69/ 2015 कलम 409 भादवी अन्वये गुन्हा दाखल झाला होता पण त्यापासून सदर आरोपी हा पोलिसांच्या हातावर तुरी देत होता अतिशय खात्रीलायक बातमीनुसार या मधील आरोपी हा एका ठिकाणी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे तळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर पोलीस शिपाई आशीष नेवारे, मनोज आसोले ,रुपेश उगेमुगे यांनी अतिशय चमकदार कामगिरी करत सदर आरोपी ला यवतमाळ येथून ताब्यात घेतले त्याला पोलीस ठाण्यात तळेगाव येथे ठाणेदार अशीच गजरे यांच्या पुढे उभे करण्यात आले.