
जालना- लक्ष्मण बिलोरे
शिवधर्म फाउंडेशन हिदुस्तान समिती हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे फाउंडेशन आहे.फाउंडेशन च्या माध्यमातून आतापर्यंत समाजकार्य व शिवकार्य मोठ्या प्रमाणात केले आहे.अभिमानाची बाब म्हणजे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छञपती संभाजी राजेंच्या नावाने चालत असलेली बिडी बंद करण्यासाठी शिवधर्म फाउंडेशनने ५ दिवस आमरण उपोषण केले. व शंभुराजेंच्या नावाचा होणारा अपमान थांबवण्यात शिवधर्म फाउंडेशनला यश आले आहे.आता शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्तान महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांत, तालुक्यांत, व गावागावांत पोहचत आहे.व त्याच बरोबर सर्वात सक्रीय कार्य मराठवाडा विभाग करत आहे.मागील १ महिन्यात शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्तान गडकोट समिति मराठवाडा विभाग प्रमुख पद शिवभक्त संदीप गाडेकर यांना दिले आहे.व त्यांनी लवकरच आपल्या कार्याची पोचपावती सर्व जिल्हा अध्यक्ष यांची निवड करून दिली आहे.शिवधर्म फाउंडेशन लवकरच मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवरती स्वच्छता मोहिम राबवणार आहे.
त्यामुळे गडकोट संवर्धन होणे हि काळाची गरज आहे. व ते कार्य आपणच करू शकतो म्हणुन मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पदाधिकारी निवड करण्यात आली आहे , आणि यामुळे शिव शंभू राजांचा खरा इतिहास निश्चितपणे नव्या पिढीला समजणार आहे.











































