Home मराठवाडा आर्थिकदृष्ट्या माणूस सक्षम झाला तरच त्याला समाजात किंमत राहाते – मा.आमदार अँड.विलासबापू...

आर्थिकदृष्ट्या माणूस सक्षम झाला तरच त्याला समाजात किंमत राहाते – मा.आमदार अँड.विलासबापू खरात

206

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

व्यापाऱ्यांची दशा आणि दिशा बदलण्यासाठी प्रियदर्शनी बँकेने पाऊल उचलले आहे,त्याचा फायदा घेतला पाहिजे.प्रियदर्थनीला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विविध अवार्ड मिळालेले आहेत.कोरोना काळात प्रियदर्शनीने ९ हजार कोटींची उलाढाल केली आहे.शासन काय चमत्कार करू शकते हे आम्हाला माहीत आहे, सरकार काय असते हे समजून घेतले पाहिजे.राष्ट्रीयकृत बँकांच्या तुघलकी कारभारामुळे विकास खुंटला आहे.व्यापाऱ्यांनी नावलौकिक मिळवला आहे.व्यापार, उद्योगामुळे भारत महासत्ता बनला आहे.सरकारची मदत घेतल्याशिवाय तुम्ही मोठे होणार कशे ? शासनाच्या आत्मनिर्भर योजने मध्ये ६५ टक्के सबसिडी आहे.२५ टक्के अनुदानाच्या अनेक स्किम आहेत याचा फायदा घेता आला पाहिजे.माणूस आर्थिकदृष्टया सक्षम झालात तरच माणसाला समाजात किंमत राहाते, असे मौलिक मार्गदर्शन माजी आमदार विलासबापू खरात यांनी व्यापारी मेळाव्यात केले.
प्रियदर्शनी बँकेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा फायदा व्यापाऱ्यांना करून देवू.कुंभार पिंपळगाव बाजार पेठ हि उद्योग औद्योगिक बाजार पेठ झाली पाहिजे.असा आमचा प्रयत्न आहे.कुंभार पिंपळगाव येथे कर्ज स्वरूपात प्रियदर्शनीच्या माध्यमातून २५ कोटी रुपये वाटप करू अशी ग्वाही अॅड.खरात यांनी व्यापारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिली.मंगळवारी,२४ आॅगष्ट रोजी कुंभार पिंपळगाव येथे व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अॅड.प्रल्हाद कंटुले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शनी ना.सह. बँकेचे चेअरमन नितीन तोतला, महाव्यवस्थापक सचीन वाणी,परिहार, युवा नेते विश्वजीत खरात, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले, पंचायत समितीच्या माजी सभापती द्वारकाताई मेहेत्रे, जि.प.सदस्य- अन्शिराम कंटुले, जीवन वगरे, रविंद्र आर्दड, भाजप जिल्हाउपाध्यक्ष अशोक राजेजाधव, महादेव काळे, भरतराव कंटुले, विष्णुआप्पा कंटुले, सुरेश पंडा,डिगांबर आर्दड, अतुल बोकन,प्रताप कंटुले, शिवाजी कंटुले,अतुल कंटुले, आसाराम उढाण, वर्धमान जैन, माणिक टेहळे,राधाकिसन सुरासे, कैलास तौर,प्रताप तौर,बबलु कंटुले, भाऊसाहेब रंधे, उद्धव साबळे,सुरेश साबळे, चत्रभुज आनंदें, शाखाधिकारी पंकज कुलकर्णी ,व्यापारी, सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान,अॅड.विलासबापू खरात यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योग आणि कृषी व्यापारी संघटनेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.