Home मराठवाडा स्मशानभूमीतील झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे,युवकांचा उपक्रम…

स्मशानभूमीतील झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे,युवकांचा उपक्रम…

216

जालना – लक्ष्मण बिलोरे

भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन,या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत तिच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडीअडचणीत ठामपणे आपल्या पाठीमागे उभे राहत,आपले संरक्षण करण्याची खूणगाठ जमू राखीच्या रूपाने भावाच्या हातावर बांधते,भाऊ देखील बहिणींच्या विश्वासाला तडा न जाऊ देता अगदी जीवनभर बहिणीचे रक्षण करतो,येथील युवकांनी देखील झाडांचे आयुष्यभर रक्षण करण्याच्या बाबींवर येथील स्मशानभूमीत युवकांनी झाडांना राख्या बांधत झाडे जगवण्याचा व झाडांचे रक्षण करण्याचा संकल्प करत वेगळया पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले आहे,युवकांनी येथील स्मशानभूमीचे रुपटे पालटले आहे,वाढदिवस साजरा करणे,धुलिवंदन साजरे करणे,दिवाळी निमित्त स्मशानभूमीत दीप लावणे,झाडांचा वाढदिवस साजरा करणे
यासारखे उपक्रम येथे राबविले आहे,आता आज येथील युवकांनी चक्क येथील बारी समाज स्मशानभूमीत झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले आहे,युवकांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या वेळीतंटामुक्ती अध्यक्ष हिरालाल कोथलकर,प्रकाश पवार,वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान पायघन,समितीचे सदस्य विशाल अस्वार,किशोरकुमार फुसे,राजू कोथलकर,गणेश पायघन,मनीष बोडखे,संजय कोथलकर,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.