Home मराठवाडा लॉयन्सच्या नेत्र तपासणी शिबिरात 61 जणांना मोतीबिंदूचे झाले निदान

लॉयन्सच्या नेत्र तपासणी शिबिरात 61 जणांना मोतीबिंदूचे झाले निदान

224

अंधांना दृष्टी प्रदान करण्याचे लॉयन्सचे कार्य प्रेरणादायी-सौ अनुसया मालू

रुग्णांना राख्या बांधून स्वागत या शिबिरासाठी जालना शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून 189 रुग्ण उपस्थित होते. आज राखीपौर्णिमा असल्याचे औचित्य साधून या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या माहेश्वरी महिला संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ. अनुसयाताई मालू, लायन्स क्लबच्या अध्यक्ष सौ. मीनाक्षी दाड, सचिव लॉ. जयश्री लढ्ढा, कोषाध्यक्ष लॉ. प्रेमलता लोया आणि महिला पदाधिकाऱ्यांनी या सर्वांना राख्या बांधून त्यांचे स्वागत केले त्यामुळे हे रुग्ण भारावून गेले

जालना-लक्ष्मण बिलोरे

जालना लायन्स क्लबच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर स्थायी प्रकल्प अंतर्गत
रविवार दि. 22 ऑगस्ट रोजी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरला आज राखी पौर्णिमा असतानाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शिबिरात सहभागी 189 पैकी 61 जणांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून. मोफत शस्त्रक्रियेसाठी त्यापैकी 30 जणांची तुकडी 24 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील लायन्स आय हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती क्लबच्या अध्यक्षा लॉ. मिनाक्षी दाड यांनी दिली.
या शिबिराला माहेश्वरी महिला संघटनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ.अनुसयाताई मालू यांनी भेट देऊन जालना लायन्स क्लब राबवित असलेल्या या अंधत्व निर्मूलनाच्या प्रकल्पाची प्रशंसा केली. डोळा हा अत्यंत महत्वाचा अवयव असून, दृष्टी असेल तरच सृष्टी पाहता येते. मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय असून, दृष्टी गेल्यास माणूस परावलंबी बनतो. अशा व्यक्तीचे जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य जालना लायन्स क्लबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असून, आपणास याचा सार्थ अभिमान वाटतो, असे सांगून त्यांनी या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. लायन्स क्लबचे अंधत्व निर्मूलनाचे कार्य 210 देशात अविरतपणे सुरू असून, त्यात जालना क्लबही महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे, असे सांगून लॉ. डॉ. गिरीश पाकनिकर यांच्या बहुमूल्य योगदानाबद्दल सौ. मालू यांनी त्यांचा सत्कार केला.
सकाळी 8 ते 2 यावेळेत शिबीर पार पडले. प्रारंभी रुग्णांची मधुमेह, रक्तदाब, आरटीपिसीआर तपासणी करण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद येथील लायन्स आय हॉस्पिटलचे डॉ. गायकवाड आणि त्यांच्या टीमने जिल्हाभरातून आलेल्या 189 रुग्णांची नेत्र तपासणी केली असता त्यातील 61 जणांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले आहे, अशी माहिती लॉ. मिनाक्षी दाड यांनी दिली. जनतेचे अंधत्व दूर करून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून लायन्स क्लबच्यावतीने महिन्याच्या दुसऱ्या व चौथा रविवारी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबीर प्रसंगी लाॅयन्स क्लब ऑफ जालनाच्या अध्यक्ष लाॅ. मीनाक्षी दाड, सचिव लाॅ. जयश्री लढ्ढा, कोषाध्यक्ष लाॅ. प्रेमलता लोया, रिजन चेअरमन लाॅ. अतुल लड्ढा, झोन चेअरमन लाॅ. शाम लोया, लाॅ. कमलबाबू झुनझुनवाला, प्रकल्प प्रमुख लॉ. डॉ. गिरीश पाकनिकर, लाॅ. विजय दाड, लाॅ. अरुण मित्तल, लाॅ. बळीराम बेंद्रे, लाॅ. जगत घुगे, लाॅ. राधेश्याम टीबड़ेवाल, लाॅ. रविन्द्र शर्मा, लाॅ. संगीता शर्मा, लाॅ. संगीता रुणवाल , लाॅ. जयप्रकाश श्रीमाली, लॉ. कमलाकर मोरे, लाॅ. डॉ रोहित कासट, लाॅ. डॉ. प्रियंका कासट, लाॅ. डॉ. राजकुमार सचदेव, लाॅ. डॉ. श्रीमंत मिसाळ, लाॅ. सतिश संचिती, डॉ. पुरुषोत्तम सोमाणी, विजय गिंदोडीया आदींची उपस्थिति होती.