Home जळगाव आदर्श हायटेक आयटीआय मधील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन , “चिकली तरसोड महामार्गाच्या अभियंत्यांचे...

आदर्श हायटेक आयटीआय मधील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन , “चिकली तरसोड महामार्गाच्या अभियंत्यांचे मार्गदर्शन”

122

भुसावळ वार्ताहर लियाकत शाह

भुसावळ तालुकयातील असलेल्या कुरह पाना येथे शनिवारी आदर्श हायटेक प्रायव्हेट आयटीआय येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये चिकली तरसोड महामार्गावर काम करणाऱ्या वेलस्पून ग्रुप कंपनीचे अभियंते सहभागी झाले होते. ज्यात शामलालजी, संतोष कुमार, वेदवीर सिंग, डी.के परिडा, अब्दुल समद सहाय्यक व्यवस्थापक तांत्रिक अभियंता, बिरणकर रॉय, असीम अदगिरी, निताई विश्वास, सिद्धार्थ सेनापती, सुमित दास, नम्रपाली गोंडाणे आणि अनेक अधिकारी तसेच मानव संसाधन विभागातील अभियंते उपस्थित होते. कार्यशाळे दरम्यान, अभियंते आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना प्रश्न आणि उत्तरे विचारली आणि त्यांचे ज्ञान वाढवले, ज्यात त्यांचे वैयक्तिक जीवन, अभियंत्यांची जीवनशैली, जीवनात पुढे कसे जायचे, महामार्ग बांधकाम कशी असतात विविध विषयांवर मार्गदर्शन केलेले. अभियंते कडून विद्यार्थ्यांना माहिती जाणून घेतली. आणि मार्गदर्शन. नंतर पुन्हा इनडोअर खेळ खेळले गेले ज्यात मटकी फोड, सुई धागा, संगीत खुर्ची, बुद्धिबळ, कॅरम इत्यादी खेळले गेले आणि विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे उपस्थित असलेले बहुतेक अभियंते हे राज्याबाहेरचे होते. मनुष्यबळ विभाग प्रमुख, शामलाल म्हणाले की जर तुमच्याकडे क्षमता आणि कौशल्य असेल तर तुम्ही कुठेही काम करू शकता आणि स्वतःला अभिमानास्पद बनवू शकता, मग यासाठी तुम्हाला घर सोडावे लागले तरी घर सोडून जा आणि तुमचे उज्ज्वल भविष्य घडवा. जे.टी महाले, एस एस कुलकर्णी, के.जे राणे, व्ही.एन राणे, एम.आर नरवाडे, जी.एस महाजन, पी.पी चौधरी, खसदर कुरकुरे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. मार्गदर्शन संस्थेचे मुख्याध्यापक एस.के कुरेशी आणि आर.बी महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो कॅप्शन: भुसावळ तालुका येथील लागून असलेल्या कुरह पाना येथे कार्यशाळेत आयटीआय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महामार्ग अभियंते (फोटो लियाकत शाह)