Home नांदेड देगलूरच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या एन एम एस परिक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून ठरले...

देगलूरच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या एन एम एस परिक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून ठरले शिष्यवृत्तीस पात्र

165

राजेश भांगे 

केंद्र सरकार कडून आर्थिक परिस्थितीने मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या नॅशनल मिन्स कम मेरिट शिष्यवृत्ती परीक्षेत देगलूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवुन पात्र ठरले आहेत.

या शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले आरती अशोक देशमुख, अनिरूद्ध मल्लिकार्जुन काळे, सृष्टी गणेश डुब्बेवार, श्रीकांत भास्कर पाटील, श्रीपाद गणेश पोतदार, श्रेया व्यंकट निडारकर,
वैभवी किरण गिरी, व गंगाप्रसाद सुरेश टोपीवाले, या सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसार शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरले आहेत.
तरी या घवघवीत मिळालेल्या यशा बदल या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
तर पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंत प्रतिवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल.