Home महत्वाची बातमी एका आईला मिळाली प्रेम करण्याची शिक्षा ,

एका आईला मिळाली प्रेम करण्याची शिक्षा ,

630

प्रियकराने केली प्रेयसीच्या लहान चिमुकल्याची हत्या ,

 

आरोपीला पोलीस कोठडी ,

 

अमीन शाह ,

अकोला ,

तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाडी अदमपूर येथे प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या आठ वर्षीय मुलाची निघृण हत्या केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली होती या प्रकरणात मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीस अटक करण्यात आली आहे . आज आरोपीस न्यायालयाने 13 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवन्याचे आदेश दिले आहेत ,

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी संजय नवलकर ( ३२ ) यास दोन अपत्ये असून , तो पत्नीविना राहत होता . तर फिर्यादी सोनाली राजू कुमरे ( ३० ) हिला दोन अपत्ये असून , ती पतीविना राहत होती . आरोपी संजय व फिर्यादी सोनाली हे दोघेही एका कारखान्यात काम करीत असताना दोघाची नजरेला नजर भिडली दोघांचे सूत जुळले . त्यामुळे आरोपी संजय व फिर्यादी सोनाली हे दोघेही वाडी अदमपूर येथे लिव्ह इन रिलेशन मध्ये सोबत राहत होते . फिर्यादी सोनालीला मुलगा वेदांत व एक मुलगी श्रावणी असे दोन अपत्ये आहेत . घटनेच्या दिवशी चिमुकला मृतक वेदांत ( ८ ) याने पिण्याच्या पाण्याच्या माठात ग्लास बुडविल्याच्या कारणावरून आरोपी संजय नवलकर याने लाकडाच्या साहाय्याने त्याला बेदम मारहाण करू लागला . हे पाहून त्याला वाचविण्यासाठी त्याची लहान बहीण लक्ष्मी ही मधात गेली असता आरोपीने त्यास ही काठीने मारहाण केली आरोपी चा राग एवढा अनावर झाला होता की त्याने लहान बालकाच्या छातीवर मोठा दगड मारला व त्यास गँभिर जखमी केले या नंतर जखमी मुलास अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतांना त्याची प्राणज्योत मालवली , या प्रकरणी मृतक मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संजय नवलकर यास अटक करून त्यास आज न्यायालया समोर उभे केले असता
अकोट येथील अतिरिक्त जिला न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी तेल्हारा पोस्टे. येथील अप क ३२३/२०२९ भादंवि कलम ३०२. सहकलम ३(२) अट्रोसिटी अक्ट प्रकरणातील आरोपी संजय शामराव नवलकार वय ३० वर्ष रा. वाडी अदमपूर याने घरामध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलाची अतिशय निर्दयपणे हत्या केल्याच्या आरोपाचा तपास करण्याकरिता या आरोपीची १३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये रवानगी केली.

या प्रकरणामध्ये  तपास अधिकारी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम अकोट सत्र न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी तर आरोपी तर्फे ऍड.मनोज वर्मा यांनी युक्तीवाद केल्यानंतर न्यायलयाने आरोपीस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश पारीत केला.

 

 

 

 

आदेशामध्ये नमूद केले की, हा प्रकार  अत्यंत गंभीर आहे. यातील संपूर्ण पुरावा निष्पन्न करणे आहे. साथीदाराची आणि आरोपीची आवश्यक आहे. आरोपीच्या रक्ताचे नमूने घ्यावयाचे आहेत. फिर्यादी व आरोपीच्या नाते संबंधाबाबत तपास आवश्यक आहे. गुन्हयातील सर्व तथ्य परिस्थिती आणि कारणासंबंधी तपास होणे आवश्यक आहे. या कारणावरून आरोपीस १३ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा आदेश पारित केला आहे.