Home मराठवाडा देविदहेगाव हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या -पॅंथर्स रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेश प्रवक्ते धम्मपाल...

देविदहेगाव हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या -पॅंथर्स रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर

311

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील देविदहेगाव येथील अनिकेत भाऊसाहेब घुगे, वय १५ वर्षे,या शाळकरी मुलाच्या हत्याकांडातील आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी पॅंथर्स रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांनी केली आहे.


देविदहेगाव हत्याकांडातील आरोपींना फाशी देण्यात यावी. तसेच पिडीतेच्या कुटुंबाना पोलिस संरक्षण देण्यात यावे. मयत झालेल्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत करावी. अशी मागणी धम्मपाल कांडेकर यांनी केली आहे.जालना जिल्हा दौ-यावर असलेले पॅथर प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी देविदहेगाव येथील पिडित कुटुंबाची भेट घेतली, तसेच राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील पालकमंत्री टोपे जालना जिल्हा पोलिस अधिक्षक विनायक देशमुख, घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पतंगे यांना निवेदन देऊन देविदहेगाव हत्याकांडातील आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी पॅथर्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कांडेकर यांनी केली आहे. या वेळी मयत अनिकेत भाऊसाहेब घुगे यांचे वडील भाऊसाहेब घुगे, आई,बहीण, भाऊ यांच्या सोबत पॅथर्स रिपब्लिकन पक्षांचे नेते कुमार जी भोले,युवा पॅथर्स रिपब्लिकन पक्षांचे तालुकाध्यक्ष संकेत गांगुर्डे, अविनाश आडागळे आदी सह समाज बांधव उपस्थित होते.

असे घडले हत्याकांड
——————————
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,देवीदहेगाव येथील १५ वर्षीय अनिकेत भाऊसाहेब घुगे या मुलाचा त्याच्या मित्रांनी महादेव नामदेव शिंदे वय १९ वर्षे, आकाश भागवत शिंदे वय १९ वर्षे या दोघांनी १ आॅगष्ट २०२१ रोजी रात्री एका मिरवणूकीतून उचलले आणि शिवारातील एका ऊसाच्या फडात गळा आवळला आणि डोक्यात दगड घालून हत्या केली.पैशाच्या देवाण-घेवाणीतून अनिकेतचा खून करण्यात आला असल्याचे प्रथमदर्शनी पोलिस चौकशीत समोर आले आहे.मयत अनिकेतचे वडील भाऊसाहेब शिवराम घुगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘अनिकेत एका जयंतीच्या कार्यक्रमात होता.तेव्हा त्याला महादेव शिंदे आणि आकाश शिंदे यांनी शेतात नेले.अनिकेतला फोन लावला तर त्याने फोन उचलला नाही.’ संशयीत म्हणून पोलिसांनी महादेव शिंदे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा प्रकार समोर आला.पोलिसांनी महादेव शिंदे आणि आकाश शिंदे या दोन आरोपींना अटक केली आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक विनायक देशमुख,अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसनिरिक्षक नितीन पतंगे, पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने, रामकृष्ण कुटे,आत्माराम घुले, भागवत खरात, खटावकर,गुसींगे, पवार यांनी केली आहे.