Home विदर्भ आर्णी पं.स.अंतर्गत परसोडा येथे काम न करताच लाखो रुपयांची उचल

आर्णी पं.स.अंतर्गत परसोडा येथे काम न करताच लाखो रुपयांची उचल

837

 बोगस मजुर 

बोगस मोजमाप पुस्तीका

नमुना ४ वर खोट्या सह्या

 चौकशीचे आदेश

देवानंद जाधव – विशेष प्रतिनिधी

यवतमाळ – आर्णी पंचायत समिती अंतर्गत परसोडा येथे , विहीर पुनर्भरणाची प्रत्यक्ष कामे न करताच लाखो रुपयांची ऊचल करुन पं स. ची तिजोरी लुटली असल्याचे धक्कादायक प्रकरण ऊजेडात आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

परसोडा येथील शेतक-यांच्या शेतातील ३१ विहीरीचे पुनर्भरण केल्याचे दाखऊन ,सदर अभियंत्याने खोटी मोजमाप पुस्तीका तयार केली आहे. ग्रामसेवक आणि रोजगार सेवकांनी नमुना क्रमांक चार रजिस्टर मध्ये खोट्या सह्या करुन प्रशासनाची फसवणूक केली आहे. या संदर्भात भागवत रंगराव आडे यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार दाखल केली आहे. जिल्हा धीकारी यांनी गट विकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहे. या गंभीर विषयांकीत तक्रारीची सखोल चौकशी करून दोषी कर्मचा-यांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ कलम २५ आणि महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९७९ अन्वये कार्यवाही प्रस्तावित करुन, स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सात दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधीकारी यांनी दिले आहे. आर्णि तालुक्यात असंख्य गावामध्ये नमुना क्रमांक चार रजिस्टर मध्ये खोट्या सह्या करुन पंचायत समितीच्या तिजोरीचे लचके तोडले आहे. दोषीवर काय कारवाई होते याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. दोषी असलेल्या अभियंता, ग्रामसेवक, आणि रोजगार सेवक यांचेवर निलंबनाची कारवाई करुन फौजदारी कारवाई करण्याची मागणी जनते कडून होत आहे. न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा ईशारा शेतक-यांनी दिला आहे.