
सुशांत आगे / पुणे
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत थोडासा विरंगुळा म्हणून जवळजवळ सगळेच लोकं सोशल मीडियावर सर्रास अॅक्टिव्ह आहेत. अशातच अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक गाण्यांचाही समावेश आहे. असंच एक गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर असो किंवा इंन्स्टा फेसबूकच्या स्टोरीज असो हे गाणं प्रत्येकाच्या स्टेटसवर आपल्याला पहायला मिळतयं “ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याने प्रत्येकाला वेड लावलं आहे. मुख्य म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर युवकांनी सध्याच्या वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर महागाईचे रेट व नेतेमंडळींचे फोटो एडिटिंग करून वाढत्या महागाईला नियंत्रण ठेवण्यासाठी नेतेमंडळींनी लक्ष केंद्रित करावे, असेही सुचवलं जात आहे.
एकंदरीत, सध्या सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर कोरोनाची कमी पण ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ने मात्र धुमाकूळ घातला आहे.हे गाणं गायक उमेश गवळी यांनी म्हटलं आहे. या गाण्याची सोशल मीडियावर सध्या एवढी क्रेझ आहे की, एका मुलाखती दरम्यान उमेश गवळी म्हणाले की, ”या गाण्याचे इन्स्टाग्रामवर अनेक शॉर्ट व्हिडिओ बनवले जात आहेत. तसंच ग्रामीण भागातील व्यक्ती सहज बोलताना देखील “ओ शेठ’ असं बोलून जातो. त्यातून हे गाणं सुचलं आहे असं यासाठी प्रणीत व संध्या या माझ्या सहकाऱ्यांनी म्युझिक दिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या गाण्याबद्दल रसिक मायबापांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे,”
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट या संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेल्या आणि भारताबाहेर हिट झालेल्या तसेच इन्स्टाग्राम रिल्स वर ट्रेडिंग गाणे असलेल्या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार असलेल्या *संध्या_प्रनिकेत* या जोडीबद्दल थोडे जाणून घेऊया…
संगीत क्षेत्रातील पहिली गीतकार-संगीतकार मेल-फिमेल जोडी संध्या_प्रनिकेत
नाशिक-उस्मानाबाद..
“आपल्या गाण्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या संध्या_प्रनिकेत या जोडीतील संध्या ज्ञानेश्वर केशे ही मूळची नाशिक जिल्ह्यातील दसक या छोट्या गावातली, गाव शहराला लागून असले तरी तेवढ्यात तेवढ्या गोष्टी तिथे उपलब्ध होत्या, जन्मापासून नाही पण संध्या शालेय शिक्षण घ्यायला लागली तेव्हा आईच्या गाणं गुणगुणण्याच्या सवयीमुळे तिला गाण्यात आवड निर्माण झाली, कुटुंबात कुणीच कलाकार नव्हता परंतु आवड खूप महत्त्वाची असते वडलांना जुने गाणे ऐकायला आवडायचे आई छान पारंपरिक गाणी गुणगूणायची आणि शाळेत बाई छान गाणी कविता गाऊन घ्यायच्या म्हणून संध्या ला यात आवड निर्माण झाली ,
संध्या पाचवीला असतांना लिहायला लागली चारोळ्या , कविता आणि ती मोठी होत गेली तस कवितेचं गाणं झालं आणि कलाक्षेत्रात आपलं काही होईल का असं वाटू लागलं, तिच्या स्वप्नांना पंख तर लागले होते पण वाट नव्हती, मग “माझा पती करोडपती” हा चित्रपट बघितला आणि आपल्या पण गावात शूटिंग च्या गाड्या याव्या आणि आपण त्या गाडीला जाऊन धडकाव म्हणजे आपल्याला शूटींग वाले सोबत घेऊन जातील , असो हा तिच्या आयुष्यातील गंमतीचा भाग झाला , तिची आवड तीच करियर आहे असे तिला खूप वाटायचे मग २०१७ ला तिने पुण्याला यायचे ठरवले पुण्यात आल्यावर स्वतः लिहिलेल्या दोन कविता रेकॉर्ड केल्या आणि त्याचे चित्रीकरण केले, पुढे दोन लघुपट केले, *व्यथा आणि यापरिन या लघुपटांना पुरस्कार देखील मिळाले* त्यांनतर २०१८ ला ती लघुपट शूटिंग वेळी प्रनिकेत ला भेटली आणि प्रनिकेत मुळचा उस्मानाबाद चा आणि डिजे प्रनिकेत अशी ओळख असलेला त्याच्या कडे माईक आणि पीसी म्हणजे रेकॉर्डिंग सेटप होता तर संध्या ने लिहिलेलं पहिलं गाणं रेकॉर्ड करायचं असा विचार तिने प्रनिकेत ला सांगितला *”गोष्ट आहे तुझी माझी”* आणि तो नाही म्हणाला परंतु संध्या म्हणाली प्रयत्न करून बघ मी पण गाणं शिकले नाहीये दोघांचा पहिला प्रयत्न असेल त्यावर प्रनिकेत तयार झाला परंतु *गीतकार आणि संगीतकार संध्या_ प्रनिकेत* हे नाव झळकणारच होत म्हणून प्रनिकेत याने तिला दोन अंतरे अजून ऍड करूयात असं म्हटलं आणि दोघांनी मिळून पुढे गाणं पूर्ण केलं पहिला प्रोजेक्ट असूनही तो प्रोजेक्ट त्यांनी tv चॅनल पर्यंत नेला आणि तिथून पुढे या जोडीने खूप म्हणजे जवळपास ५० हुन अधीक गाणी यूट्युब प्लॅटफॉर्म साठी केलीत त्यातील *देवाला नवस करते* हे गाणं सुद्धा लॉकडाऊन काळात छान व्हायरल झाल होतं, आणि २०१८ ते २०२१ पर्यंत च्या प्रवासातल संध्या प्रनिकेत या जोडीच *ओ शेठ तुम्ही नादच केला थेट* हे गाणं खरच सर्वांना आवडलं आणि आज गाण्याने १ करोड प्रेक्षकांचा टप्पा पार केला आहे. संध्याची मेहनत , आत्मविश्वास आणि आपल्या आवडीला आपलं करियर करण्यासाठी ची धडपड या गाण्याने फळाला आली.
फक्त प्रनिकेत ऐकण्यापेक्षा डिजे प्रनिकेत हे ऐकायला भारी वाटत ना ?
तर मित्रांनो या प्रनिकेत ने आज साता समुद्रापार आपलं अस्सल मराठी गाण पोहचवल आहे तर ते गाणं तुम्हाला माहिती असेलच *”ओ शेठ” तुम्ही नादच केलाय थेट* हे गाणं सध्या खूप व्हायरल झालंय
प्रनिकेत हा उस्मानाबाद जिल्यातील किणी या गावचा राहणारा असून
त्याने 2013 पासून या क्षेत्रात सुरुवात केली, Dj ही त्याची ओळख , 10 वी नापास झालेला हा मुलगा आज महाराष्ट्र च नव्हे तर जगात त्याच्या संगीताची जादू दाखवतोय. प्रनिकेत मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील किनी या छोट्याशा गावातील सामान्य कुटुंबातील मुलगा.
खूप दिवसांच्या स्ट्रगल नंतर 2018 ला संध्या आणि प्रनिकेत एकमेकांना भेटले आणि तिथून पुढे त्यांच्या या संगीतमय प्रवासाची सुरुवात झाली. गीतलेखन तसेच music हे दोघे सोबत करू लागले आणि एकाहून एक छान छान गाणी लिहिली त्यातील *गोष्ट तुझी माझी तसेच देवाला नवस करते , महाराष्ट्र तुझ्यावर फिदा गं ज्ञानदा , अशी खूप गाणी हिट झाली*
संध्या प्रनिकेत या दोघांनी खूप मेहनत घेतली आहे आणि आज *ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट* या गाण्यामुळे त्यांना जे यश मिळालंय खरच ते अवर्णनीयच आहे त्यांना असेच यश मिळत राहो हीच प्रार्थना.
संध्या प्रनिकेत ही जोडी असेच हिट गाणे प्रेक्षकांना देत राहो एवढीच त्यांना आमच्याकडून मागणी आहे.संध्या आणि प्रनिकेतला आमच्या कडून लाख लाख शुभेच्छा
त्यांच्या पुढील वाटचालीस ही हार्दिक शुभेच्छा..!











































