Home छ. संभाजीनगर बहोल्यावर चढण्याआधीच नवरीने त्याला पहोचवले पोलीस ठाण्यात ??

बहोल्यावर चढण्याआधीच नवरीने त्याला पहोचवले पोलीस ठाण्यात ??

653

 

 

 

अमीन शाह ,

अशा अनेक घटना समोर येत असतात, ज्यात मुलगा-मुलगी आणि घरच्यांची पसंती होऊन लग्न जमतं. अगदी सगळं ठरलेलं असतं. मात्र, अचानक काहीतरी विचित्र घडतं आणि ऐनवेळी हे लग्न रद्द होतं. बऱ्याचदा यात हुंडा  हे महत्त्वाचं कारण असतं. असंच काहीसं एक प्रकरण आता औरंगाबादमधून समोर आलं आहे. यात नवरदेवाच्या मागण्या ऐकून नवरीनं लग्नाला नकार दिला आहे.

लग्नात हुंडा मागणे बेकायदेशीर असले तरी आजही अनेक ठिकाणी सर्रास हुंडा किंवा किंमती वस्तू मागितल्या जातात आणि वधुपिता ते देतोही. नाशिकच्या एका मुलाचे औरंगाबादेतील एका मुलीसोबत लग्न ठरलं. या दोघांचा साखरपुडाही झाला. या घटनेतील नवरदेवाचं नाव आहे अशोक चराटे. सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं, मात्र लग्न जवळ येताच मुलानं अजब मागणी केली.

ना पैसे ना गाडी, नवरदेवानं मागितलं भलतंच काही; पोलिसांत गुन्हा दाखल ,

या नवरदेवानं मुलीच्या वडिलांकडे 10 लाख रोकड, 21 नखी जिवंत कासव आणि काळा लाब्रा डोर जातीचा कुत्रा, याची अशी मागणी केली. या अजब मागणीमुळे मुलीचे वडील चक्रावले. मात्र, नवरी मुलीला या अजब मागणीची माहिती मिळताच तिने क्षणाचाही विलंब न करता या लग्नास नकार दिला. हे लग्न मोडण्यासोबतच तिनं नवरदेवाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दिली.