
पुणे प्रतिनिधि
पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य सर्व पदधिकारी पोलीस विभाग व सर्व सामन्यांच्या न्याय हक्कासाठी,कार्य करीत आहेत,याचाच एक भाग म्हणून सध्या कोरोणा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रात असल्याने सर्व सामान्य, गरिब निराधारांची आर्थिक स्थिति नाजुक असल्यामुळे आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करीत आहे,समाजाला काही परत देण्याची प्रवृत्ति जोपासुन त्यांना काही मदतीचा हात देता येईल हा विचार मनाशी बाळगुन त्याअनुषंगाने आज दिनांक 19-07-2021 रोजी पोलिस मित्र परिवार समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी येथील गोर गरीबांना,निराधारांना मोफत अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.सदर उपक्रमासाठी अध्यक्षस्थानी म्हणून पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य सह सचिव श्री. विशाल देशमुख होते.तसेच सदर उपक्रमाचे नियोजन व आयोजन श्री.हितेश पारीख, पुणे शहर अध्यक्ष पोलिस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य व सर्व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती च्या पदधिकाऱ्यांनी शिस्तबद्ध पध्दतीने व शासनाच्या आदेशानुसार व नियमानुसार सदर उपक्रम राबविण्यात आला.











































