Home विदर्भ गुरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला

गुरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला

613

इकबाल शेख

वर्धा –  दि.15/07/2021
तळेगांव (शा.पं.) : – गोपणीय माहितीच्या आधारे स्थानीक पोलीसांनी जनावरांची अवैध वाहतुक करणारा कंटेनर पाठलाग करुन ताब्यात घेतला. या कंटेनर मध्ये 48 जनावरे कोंबुन ती कत्तलीसाठी नेली जात होती असे पोलीसांच्या चाैकशीत पुढे आले आहे.त्यातील 19जनावरे मृत तर 29 जनावरे जख्मी अवस्थेत आढळून आली.
तळेगाव पोलीसांना मिळालेल्या गोपणीय माहीतीनुसार नागपुर कडुन अमरावती कडे कंटेनर क्रं. H R- 38 Q- 4763 हा अवैध गुरांची वाहतुक करीत असल्याची सुचना मिळाली तेव्हा मध्यरात्री दोन वाजताचे सुमारास ठानेदार आशिष गजभिये व पी.एस. आय. पवन भांबुरकर व सहकार्‍यांनी सदर कंटेनरचा पाठलाग करुन खडका शिवारात रामदेव हॉटेल समोर कंटेनर पकडला असता त्यामध्ये अमानुषपणे गोरे व बैल कोंबुन असल्याचे आढळले.यातील गुरांची एकूण किंमत सात लाख वीस हजार. व कंटेनर वीस लाख असा एकूण 27 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. चाैकसी अंती ट्रक मध्ये वाहतुक करण्यात येत असलेल्या गोऱ्हे व बैल कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. सदर कंटेनरसह चालक रफिक उर्फ चूने खान वय 53 वर्ष रा. कानपूर ता. बिल्लोर. उत्तरप्रदेश, वाहक सानु उर्फ रियाज वय 26 वर्ष रा. ता.जी. ओर्यया उत्तरप्रदेश यांना कंटेनरसह ताब्यात घेवुन त्यामधील लहान मोठ्या 29 बैलांना केकतपुर जी.अमरावती येथील गोरक्षणमध्ये रवाना करण्यात आले. व मृत बैलांचा दफनविधी पोलीस बांधवांनी व गोरक्षकांनी पार पडला. सदरची कारवाई ठानेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आई. पवन भांबुरकर, जमादार वसंता मुंगले, संदीप महाकाळकर, मनोज आसोले,राहुल अमुने व चालक देवेंद्र गुजर यांनी केली.