
इकबाल शेख
वर्धा जिल्हा आष्टि तालुका येथिल तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खडकी व वाघोली रोड वर आज सकाळी 6:30 ते 7 वाजताच्या दरम्यान मोटार सायकल व ऑटो मध्ये जोरदार धडक होऊन अपघात घडला. सविस्तर वृत्त असे की नरसापुर येथील रहिवासी श्री बबन सूर्यभानजी मुंदाने वय अंदाजे 60 ते 65 वर्ष हे दुचाकी क्रमांक mh32 4804 ने वाघोली कडून खडकीचे दिशेने जात असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या खडकी वरून मजूर घेऊन जात असलेल्या ऑटो क्रमांक एम एच 32 एके 0470 चा चालक रमेश कडू राहणार खडकी यांच्या ऑटो सोबत आमोरा समोर झालेल्या धडकेत दुचाकीचालक बबन मुंदाने हे गंभीर स्वरूपात जखमी होऊन त्यांचा पाय धडापासून वेगळा झाला. यावेळी स्थानिकांच्या मदतीने जखमीस आर्वी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम उपचार करून सेवाग्राम येथे जखमीला पुढील उपचाराकरिता रवाना करण्यात आले. पुढील तपास पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत आहे.










































