Home विदर्भ कुर्लीचे सरपंच सतिष गड्डमवार सह पांच आरोपी विरूध्द पारवा पोलीस ठाण्यात विनयभंग...

कुर्लीचे सरपंच सतिष गड्डमवार सह पांच आरोपी विरूध्द पारवा पोलीस ठाण्यात विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल..।

469

🔵 सहाय्यक शिक्षिकेची पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..!

🔵 दिड लाख रुपयाच्या खंडणीची मागणी..!

विनोद पत्रे,
यवतमाळ (जिल्हा प्रतिनिधी)

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील सरपंच सतिष लचमारेड्डी गड्डमवार (४९), माजी सरपंच विलास राजन्ना बडगुलवार (४८), सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर (४५), शिक्षक किसन किणाके (५०) व शिक्षक नितीन मुद्देलवार (३६) आदींनी कुर्ली येथील सहाय्यक शिक्षिका यांना शरीर सुखाची मागणी करुन प्रकरण बंद करायचे असेल तर दिड लाख रुपये द्यावे लागेल अशी धमकी दिल्या प्रकरणी, सहाय्यक शिक्षिका हिच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी कुर्लीचे सरपंच सतिष गड्डमवार, माजी सरपंच विलास बडगुलवार, सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर, किसन किणाके, नितीन मुद्देलवार आदींविरुद्ध भादंवि कलम ३८४, ३५४ (अ), १४३,१४९,५०४ व ५०६ अन्वये पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. या प्रकरणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण विभागात खळबळ माजली आहे.

तालुक्यातील कुर्ली येथील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या सहाय्यक शिक्षिका ह्या सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता शाळेत विद्यार्थी नसल्याने कुर्ली येथील मराठी शाळेतील मुख्याध्यापक कार्यालयात एकट्या बसुन होत्या. त्याच वेळी सरपंच सतिष गड्डमवार, माजी सरपंच विलास बडगुलवार, दिपक महाकुलकर, किसन किणाके व नितीन मुद्देलवार हे पांचही जन मुख्याध्यापक कार्यालयात येऊन सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर व किसन किणाके यांनी सहाय्यक शिक्षिका यांना उद्देशून म्हटले की, तुमची डिलेव्हरी वगैरे झाली काय? असे म्हटले. तेव्हा शिक्षिकेचा राग अनावर झाल्याने त्यांनी म्हटले की, तुम्हाला लाज वगैरे आहे की नाही. असे म्हटल्यावर पुन्हा त्यांनी झोपायला येते काय, कशी मजा येते असे म्हणुन अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी केली. तसेच तुमचे प्रकरण बंद करायचे असेल तर दिड लाख रुपये आम्हाला द्यावे लागेल व आमचे सोबत रात्र घालावी लागेल, अशी अश्लिल भाषा वापरली, असे पारवा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत नमुद आहे.

या पुर्वी सुध्दा कुर्लीचे सरपंच सतिष गड्डमवार, माजी सरपंच विलास बडगुलवार, दिपक महाकुलकर, किसन किणाके व नितीन मुद्देलवार आदींनी वारंवार सहाय्यक शिक्षिकेला शरीर सुखाची मागणी करुन अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याची बाब पारवा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत नमुद आहे.

पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरख चौधर हे सदर प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.