Home नांदेड देगलूर येथे टिप्पर खाली चिरडुन एका पंधरा वर्षीय बालकाचा मृत्यू

देगलूर येथे टिप्पर खाली चिरडुन एका पंधरा वर्षीय बालकाचा मृत्यू

415

नांदेड प्रतिनिधी / राजेशNभांगे

देगलूर येथे ऐन शहराच्या मध्यभागीच डॉ पब्बावार यांच्या क्लिनिकच्या जवळपास मुख्य रस्त्यावरून जात असलेल्या टिप्परचा समोरून येणाऱ्या समर्थ ओमप्रकाश रघुतेरवार या पंधरा वर्षीय बालकाला धक्का लागुन चाका खाली आल्याने जागीच मृत्यू झाला.

तर चालक आणि वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर आपघातात चालकावर भांदवि.गुन्हा क्र.२७९ व ३०४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे देगलूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीभगवान धबडगे यांनी सांगितले.

तर गेल्या एका महिन्यात च देगलूर शहरात टिप्परणे झालेला हा दुसरा मोठा अपघात ठरला आहे.
काहि दिवसांपुर्वी च मदनुर नाका रोडवर अश्याच एका टिप्परने दुचाकीस उडले असता त्यात दुचाकि चालक गंभीर जख्मी झाला तर पठि मागील सीठवर बसलेली महिला व बालकाचा टिप्परच्या चाकाखाली चिरडुन असाच ह्रदयद्रावक मृत्यू झाला.

तर यावरून एक गोष्ट निदर्शनास येते कि शहारामधुन अवजड वाहन बेफाम पणे चालव किड्या-मुंगयांसारखे चिरडुन निष्पाप लोकांचे जीव घेण्याऱ्या ह्या मुजोर टिप्पर चालकांवर प्रशासनाचे काही अंकुश आहे कि नाही हे प्रकर्षाने जाणवते आहे असे जनसान्यांतुन बोलले जात आहे.