Home विदर्भ भारत कामगार संघटनेच्या काम बंद आंदोलनाला यश

भारत कामगार संघटनेच्या काम बंद आंदोलनाला यश

348

 इकबाल शेख

वर्धा –  दिनांक 27/ 6 /2021 रोजी शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख तथा जय भारत टेक्स्टाईल कामगार संघटना पुलगांव चे अध्यक्ष श्री बाळाभाऊ शहागडकर तसेच कामगार संघटनेचे सचिव अमित भाऊ शेळके आणि कामगाराच्या उपस्थितीमध्ये जय भारत टेक्स्टाईल मिलचे मॅनेजर श्री सोनी साहेब यांच्याशी चर्चा करून यांना निवेदन देण्यात आले की कामगारांच्या वेतन वाढी संबंधित तसेच कामगारांच्या पी .एफ. रक्कम काढण्याकरिता अधिकृत स्वाक्षरी अधिकार्‍याची नियुक्ती करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

हे निवेदन सर्व कामगारांच्या उपस्थितीत देऊन मील बंद करून आंदोलन सुरू झाले त्या आंदोलनाला आज दिनांक ४/७/२१ रोजी जय भारत टेक्स्टाईलचे जनरल मॅनेजर माननीय श्री सोनी साहेब आणि महादेवजी कणसे यांनी कामगारांच्या मागणीनुसा ३०+२० पन्नास रुपये बेसिक वर पगार वाढ करण्या बाबत आणि ई.पी.यफ व.ई एस आय लागु करण्या बाबत लेखी पत्र देण्यात आले जय भारत कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख बाळाभाऊ शहागडकर जय भारत कामगार संघटनेचे सचिव अमित भाऊ शेळके पुलगांव येथील ठाणेदार गायकवाड साहेब सतीश वाघ नितीन राऊत अमित जामकुठे दिनेश बुरघाटे वैभव धांदे आणि समस्त कामगार आणि महिला कामगार उपस्थित होते पगार वाडी संबंधि मिल मालक प्रवीन जी तायल साहेब जनरल मॅनेजर सोनी साहेब तसेच ठाणेदार गायकवाड साहेब महादेवराव कणसे त्यांचे आभार बाळाभाऊ शहागडकर यांनी व्यक्त केले मिल आज पासून सुरू करण्यात आला.