
इकबाल शेख
वर्धा – दिनांक २०-११-२०१८ रोजी फिर्यादी नामे संतोष दशरथ येळमे, वय ३० वर्ष, रा. सुकळी स्टेशन, ता. सेलु, जि. वर्धा यांना आरोपी नामे दिपक गोमाजी जुगनाके, वय ३२ वर्ष, रा. सुकळी स्टेशन, ता. सेलु, जि. वर्धा याने कोयत्याने मारहाण करुन जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करुन गंभीर जखमी केल्याने पोलीस स्टेशन सेलु येथे अप.क्र. ७०५/२०१८ कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाला तेव्हा पासुन गुन्ह्यातील आरोपी हा फरार होता. सदर बाबत मुखबीरकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने मौजा खैरी पन्नासे, ता. हिंगणा, जि. नागपूर येथे सापळा रचुन वरील नमुद आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले व पुढील व पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन सेलु यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात मा. पोनि. श्री. निलेश ब्राम्हणे, सपोनि. महेन्द्र इंगळे यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. सौरभ घरडे, पोलीस अंमलदार अशोक साबळे, अनिल कांबळे, अवि बनसोड, नितीन मसराम यांनी केली.










































