
ईकबाल शेख
वर्धा – हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर येथे आज दि. 30.6.2021 रोजी ना.दे.कृ. सं.प्र. अंतर्गत कापुन पिकावर शेतीशाळा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये सापळा पिके, पक्षी थांबे , कामगंध सापळे, दशपर्णी व निंबोळी अर्क, माती परीक्षणानुसार रासायनिक खते व्यवस्थापन, रासायनिक किटकनाशके व तणनाशक फवारणी ई. वर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. नंतर गावातील बीबीएफ , पट्टा पेरणी व पारंपारिक पद्धतीने पेरणीच्या प्लाॅटला , बीबीएफ वरील सोयाबीन भुईमूग शेताला व दशपर्णी प्लांटला भेट देण्यात आली. शेतीशाळेत VCRMC चे सदस्य , शेतकरी , कृषी सहायक श्री जे जे परमार, समूह सहाय्यक श्री नितीश वानखेडे शेती शाळा समन्वयक श्री हनुवते साहेब शेतीशाळा प्रशिक्षक हेमचंद गुप्ता व ग्रामस्थ नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयेंसेवक सचिन महाजन विनोद सावज , विलास राऊत गजानन पोहनकर , छाया आंबटकर ,रणजित हाते,उपस्थित होते.










































