Home परभणी राजे मल्हारराव होळकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्याची गरज- सखाराम बोबडे पडेगावकर

राजे मल्हारराव होळकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्याची गरज- सखाराम बोबडे पडेगावकर

1145

परभणी  -राजे मल्हारराव होळकर यांच्या कार्याचा जगाला आदर्श देणारा आहे,हा वारसा पुढे चालवण्यासाठी गोविंद यादव यांच्यासारखे युवक पुढाकार घेत आहेत ही अभिमानाची बाब असल्याचे मत आहे धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गुरुवारी व्यक्त केलं.

ते येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात राजे मल्हारराव होळकर पुण्यतिथी, के राजीव सातव स्मृती आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पानवठा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
गंगाखेड येथे मोठा पशुवैद्यकीय दवाखाना आहे .यात परिसरातील जनावरे उपचारासाठी येतात .पण या ठिकाणी आल्यानंतर त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. जीर्ण झालेला हौद बऱ्याच वर्षापासून पाण्याविना पडून होता. राजे मल्हारराव होळकर यांची पुण्यतिथी, खासदार राजीव सातव यांची स्मृती व गोविंद यादवव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या हौदाचा जीर्णोद्धार करण्यात आला. येथे उपचारासाठी येणाऱ्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या छोटेखानी कार्यक्रमाचे उद्घाटन अभियंता नागेश पैठणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष युनूस भाई ,सुशांत चौधरी आदींनी आपले विचार मांडले.
गंगाखेड येथील सल्लागार अभियंता नागेश पैठणकर यांच्या हस्ते आणि कॉंग्रेस शहराध्यक्ष शेख युनुस, युवा नेते सुशांत चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी विधासभाध्यक्ष बालासाहेब टोले पाटील, दत्तराव भिसे, मुंजाभाऊ लांडे, बालासाहेब यादव यांच्या प्रमुख ऊपस्थितीत हा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. राजे मल्हारराव होळकर, ॲड. सातव यांना अभिप्रेत असलेली समाजासेवा करण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला. सवंगडी कट्टा समुहाचे रमेश औसेकर, परसराम गिराम, मनोज नाव्हेकर, लक्ष्मण देवकते, राजाभाऊ यादव, रंजीत शिंदे, गजानन पारवे, डिगंबर गिराम, सुधाकर शिंदे, शिवा यादव, सुहास देशमाने, प्रदीप चौधरी, रफीकभाई, सचिन यादव आदी यावेळी ऊपस्थित होते. दवाखाण्यात मुक्या जनावरांसाठी पाण्याची सोय झाल्याने पशुपालक आणि दवाखाण्यातील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. राजे मल्हारराव होळकर आणि राजीव सातव यांना याप्रसंगी अभिवादन करण्यात आले.