Home विदर्भ वर्धा जिल्हातील अल्लीपुर येथील दोन सख्या अल्पवयीन मुलीचे बालवीवाह थांबविले

वर्धा जिल्हातील अल्लीपुर येथील दोन सख्या अल्पवयीन मुलीचे बालवीवाह थांबविले

466

ईकबाल शेख

वर्धा -जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्धा यांच्या माध्यमातून अल्लीपुर येथे बाल विवाह बाबत कार्यवाही करण्यात आली.

श्रीराम मुंदडा तहसीलदार हिंगणघाट यांच्या,गट वीकास अधीकारी संघमित्रा कोल्हे,एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल चिरूटकर यांच्या आदेशानुसार अल्लीपूर ला जील्हा बाल सरक्षन कक्ष व्दारे प्रत्यक्ष गावांत भेट दिली असता दोन्ही मुली अल्पवयीन असल्याचे दिसून आले, पोलीस नीरीक्षक शैलेश शेळके व अल्लीपुर पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने मुलीचे आई वडील व नातेवाईकांना समज देण्यात आली व मार्गदर्शन केले, सदर बालविवाह होत असल्याची माहिती गाव बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून मिळाली, सदर मुलिंचे वय 17 वर्षे 8 महिने दुसरीचे 17वर्षे असल्याचे निदर्शनास आले, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अल्पवयीन मुलीचे बाल विवाह होणार नाही या बाबत सूचना देण्यात आल्या, तसेच पालकांकडून जबाब नामा लिहून घेऊन पालकाला समज देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत अल्लीपुर येथे गावं बाल संरक्षण समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन ठराव घेण्यात आला, तसेच अल्पवयीन दोन्ही बालिकेला बालकल्याण समिती समोर उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या,त्यावेळी अल्लीपुर गावाचे सरपंच नीतीन चंदनखेडे ,उप सरपंच वीजय कवडे, ग्रामवीकास अधीकारी दत्तात्रय दीवटे ,उज्वला गुळघाने पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका मनीषा सुरकार, गाव बाल संरक्षण समिती सदस्य सतीश काळे,अल्लीपुर पोलीस स्टेशन कडून जमादार राजेश्वर शिरभाते , ममता वैतागे,तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.सदर बालविवाह प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी गाव बाल संरक्षण समिती सदस्य यांना व आई वडील यांना मार्गदर्शन केले व समज देण्यात आली. त्यावेळी संरक्षण अधिकारी वैशाली मिस्किन, सामाजिक कार्यकर्ता मेघलता तमगिरे , माहिती विश्लेषक सचिन वाटगुळे उपस्तीत होते,सदर अधिकारी व कर्मचारी बाल विवाह थांबवण्यास यशस्वी झाले.