Home मराठवाडा वृद्ध कलावंतांचा मानधनाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल माजी आमदार विलासबापू खरात यांचा सत्कार

वृद्ध कलावंतांचा मानधनाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल माजी आमदार विलासबापू खरात यांचा सत्कार

368

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी- अंबड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलासबापू खरात यांनी वृद्ध कलावंतांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी त्यांना वृद्धापकाळात जगण्यासाठी आधार म्हणून शासकिय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.भजनी मंडळातील गायक, किर्तनकार, प्रवचनकार,भारूडकार, अभंग, गवळणी म्हणणारी कलावंत , लोकनाट्य, नाट्य मंडळातील कलावंत,एकतारी भजनी, गोंधळी,पखवाज,पेटीमास्तर, तुणतुणे,डफडी,पुंगानी, टाळकरी, ढोलकी वादक, नृत्यांगना,हास्यसंमेलनातील कलावंत,डफ,बॅंडबाजा,बासरी वादन,जलसे, तमाशा कलावंत आदी कलाकारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर विलासबापू खरात यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून या कलावंतांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल माजी आमदार विलासबापू खरात यांच्या चाहत्यांनी , भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांनी तसेच वृद्धकलावंतांनी त्यांची प्रत्यक्ष भेट देऊन आभार मानले.भाजप कार्यकर्ते तथा प्रियदर्शनी चे संचालक भरतराव कंटुले, वृद्ध कलावंत कमिटी तालुकाध्यक्ष पोलिस पाटील विष्णुआप्पा कंटुले,विश्वजित खरात, सांस्कृतिक सेल तालुकाध्यक्ष रघुनाथ मुकणे, किसान मोर्चा सरचिटणीस बाबासाहेब आर्दड, चेअरमन रामभाऊ काळे, वाघमारे यांनी विलासबापू खरात यांचा यथोचित सत्कार केला.