
सांडपानी बाबत एम आय एम पक्ष नाशिराबाद तर्फे ग्रामविकास अधिकारी यांचा घेराव
रावेर (शरीफ शेख)
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील
नशिराबाद येथे निवेदन देण्यात आले. काल दिनांक 10 फेब्रुवारी रोजी नशिराबाद ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बी एस पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदन निवेदनात ताज नगर, खाजा नगर, कादरी नगर व इतर गावातले, घरातून निघालेले सांड पाणी गटारी नसल्याने तेथील रहिवाशांच्या घरात शिरू लागले आहे. व त्या संपण्यापासून डासांचे प्रणाम वाढीस लागले आहे. व त्यापासून रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व पुढे संपूर्ण गावात काँक्रीटीकरण करण्यात यावे. व संबंधित राहिवाश्यांची अडचण सोडवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांने कामचुकारपणा न करता तात्काळ राहिवाश्यांच्या अडचणी सोडवावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. व वरील सर्व संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली. व बी एस पाटील यांनी आश्वासनही दिलं की लवकरात लवकर प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्न करेल.
यावेळी चर्चा करतांना ए आई एम आय एम पक्षाचे नशिराबाद शहर अध्यक्ष आसिफ शेख , कार्यअध्यक्ष वासिफ अली, शहर सचिव सलमान शेख, उपसचिव रईस मण्यार, जूनैद शेख,मुजम्मिल मण्यार व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते…











































